Amalner

Amalner: लालबाग शॉपिंग प्रकरण..!नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्यावर 39/2 प्रमाणे मनाई हुकूम काढा..!सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी..!

Amalner: लालबाग शॉपिंग प्रकरण..!नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्यावर 39/2 मनाई हुकूम काढा..!सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी..!

अमळनेर आज दिनांक 28 रोजी tp no -124 च्या दुकाना पुढे 8×12″ बखळ जागा असे दर्शवून वाढीव बांधकाम ठराव केल्या प्रकरणी नगर अध्यक्ष सहित नगरसेवक अपात्रतेवर नगरपालिका दालनात चर्चा झाली. त्यात वकील यज्ञेश्वर यांनी आम्हास नोटीस प्राप्त प्राप्त झाली नाही ही सबब सांगून पुढील तारीख मागणी केली आहे त्यावर अनंत निकम तक्रारदार यांनी मा. जिल्हाधिकारी यांना मांडणी करताना सांगितले की मा. मुख्यधिकारी यांनी जानून बुजून कार्यकाळ संपल्या नंतर अभिप्राय पाठवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केला आहे.त्यावर लक्ष द्यावे तसेच कार्यकाळ संपला असला तरी सामने वाले नगराध्यक्षा सहित नगर सेविका / सेवक यांच्यावर “दिवाणी प्रक्रिया संहिता 39/2 प्रमाणे मनाई हुकूम काढावा ” जेणेकरून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना निवडणूक लढता येणार नाही. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सामनेवाला यांचा से आल्यावर पुढील तारखेला चर्चा करण्याचे सांगितले. मुख्यधिकारी मा. प्रशांत सरोदे, अनंत निकम (तक्रारदार ) आणि नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक अपात्र प्रकरणावर बाजू मांडण्या साठी यज्ञेश्वर वकील होते तसेच ऑनलाईन जिल्हाधिकारी होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button