Amalner

Amalner: जशने ईद- ए- मिलादुन्नबी च्या जुलुस ( मिरवणूक) मार्गाची  साफ-सफाई करावी..अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान कमिटीची मागणी

Amalner: जशने ईद- ए- मिलादुन्नबी च्या जुलुस ( मिरवणूक) मार्गाची साफ-सफाई करावी..अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान कमिटीची मागणी

अमळनेर वरील विषयानुसार अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात जशने ईद- ए- मिलादुन्नबी सण दि. २८ सप्टेंबर २०२३ वार गुरुवार रोजी आहेत परंतु त्याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी एकमताने असे ठरविले की जशने ईद- ए- मिलादुन्नबी जुलुस (मिरवणूक) दि. २९ / ९/ २०२३ वार शुक्रवार रोजी काढणार आहे.
सदरील जुलुस ( मिरवणूक ) दि. २९ सप्टेंबर २०२३ शुक्रवार रोजी दुपारी २ वा. कसाली मोहल्ला, आखाडा मकान येथून निघणार आहे. तसेच जामा मस्जिद वाडी चौक,पान खिडकी,सराफ बाजार दगडी दरवाजा,पाच कंदील चौक,गांधलीपुरा मेहेतर कालनी, मार्गाने इदगाह मैदानावर सायं ५:३० असर ची नमाजपठण करण्यात येईल.
१) कसाली मोहल्ला ते इदगाह मैदान
२) शआहआलम नगर ते कसाली मोहल्ला
३) मिलचाल ते पाच कंदील चौक
४) तांबेपुरा ते पाच कंदील चौक या मार्गांनी येणार आहे तरी महाशयांनी सदरील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी ही कळकळीची नम्र विनंती
निवेदन देताना अमळनेर शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान चे अध्यक्ष-नसीर हाजी,जेष्ठ नगर सेवक सलीम टोपी,सुन्नी दारूल क़ज़ा चे अध्यक्ष-रियाज़ शेख,मा.नगर सेवक शेखा हाजी इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button