Pandharpur

महाराष्ट्रातील ओबीसी समाज्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – शरद कोळी

महाराष्ट्रातील ओबीसी समाज्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – शरद कोळी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर महाराष्ट्रातील ओबीसी, व्हिजेएनटी, एसटी व अठरा पगड बारा बलुतेदार समाज्यातील महत्त्वाचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी समाज्यातील प्रामुख्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, निराधार अशा आदी महत्त्वाकांशी जीवणाशी निगडीत असलेल्या पेंडींग समस्यांबाबत दिवस-राञ काम करून मदत व पुर्वसन मंञी विजय वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कडून आमच्या हक्काचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे मत धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी जनमोर्चा युवक प्रदेश अध्यक्ष शरद कोळी यांनी व्यक्त केले आहे.
सध्याची मोठ्या प्रमाणात वाढती बेरोजगारी पहाता केंद्र व राज्य सरकार यांना येणार्या काळात लवकरच खाजगी क्षेञातही आरक्षण लागू करण्यास भाग पाडू कारण नोकरी व नोकरीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणे हा आपला हक्क आहे सध्या स्थितीला आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली गेली असल्याने विद्यार्थ्यांच्या पालन पोशणाचा व शालेय खर्च करण्यास अत्यंत अडचणी येत असुन त्यासाठी खाजगी क्षेञातही आरक्षण लागू करणे गरजेचे बनले असल्याचे मत ही शरद कोळी यांनी व्यक्त केले आहे. याच बरोबर ओबीसी मंडल कमिशनची उर्वरित सर्व शिफारशिंची पुर्तता लवकरात-लवकर लागू करण्यास सरकारला भाग पाडू त्यासाठीच राज्यातील सर्व ओबीसी, व्हिजेएनटी, एसटी, अठरा पगड बारा बलुतेदार समाज्यातील नागरिकांनी एकञीत येऊन संघटीत होणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button