Amalner

Amalner:जैतपिर येथे शेतकऱ्याची दुचाकी चोरीस…

Amalner:जैतपिर येथे शेतकऱ्याची दुचाकी चोरीस…

अमळनेर येथील जैतपिर गावात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी छोटू मगन धनगर रा जैतपिर दि 3 मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटर सायकल क्र. एम एच 19 बीए 8023 ने शेतात मका पिकास पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यांची दुचाकी शेताच्या बांधावर लावली होती.शेतात पाणी भरून परत आल्यानंतर दुचाकी त्याठिकाणी आढळून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध शोध घेतला पण दुचाकी मिळून आली नाही म्हणून मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तपास पो ना सुनील तेली करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button