Amalner

Amalner: उदयोन्मुख युवा नेतृत्व राहुल बडगुजर यांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी…!वाढत्या थंडी च्या पार्श्वभूमीवर गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप..!

Amalner: उदयोन्मुख युवा नेतृत्व राहुल बडगुजर यांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी…!वाढत्या थंडी च्या पार्श्वभूमीवर गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप..!

अमळनेर येथील श्रीराम नवमी सार्वजनिक अध्यक्ष आणि नवोदय युवा मंच चे शहर युवाअध्यक्ष राहुल बडगुजर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त 26 जानेवारी बुधवार रोजी वाढती थंडी व परिस्थिती लक्षात घेऊन सदर जन्मदिवसाच्या शुभ प्रसंगी उबदार ब्लँकेट(रग) वाटप केले.राहुल बडगुजर हे उदयोन्मुख युवा नेतृत्व असून आज वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ब्लॅंकेट वाटप केले आहे.रेल्वे स्थानक,गायत्री मंदिर, मंगळ ग्रह मंदिर परिसरातील गरजू व वंचित घटकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी उदय पाटील सर,शुभम येवले,अक्षय पोरवाल,सोनू पाटील,पंकज शेठे,राहुल महाजन,तुषार ठाकरे इ युवा वर्ग उपस्थित होते.राहुल ने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आज राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी राहुल यास प्रत्यक्ष भेटून,भ्रमणध्वनी आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button