Amalner

Amalner:मुलांच्या खेळण्यावरून वाद..दंगलीचा गुन्हा दाखल..

Amalner:मुलांच्या खेळण्यावरून वाद..दंगलीचा गुन्हा दाखल..

अमळनेर येथील पाडसे या गावात मुलांच्या खेळण्याच्या भांडणातून वाद झाल्याने आधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गौतम गव्हाणे हा पाडसे गावात परिवारासह राहणारी त्याची आत्या मीराबाई आधार शिरसाठ असे वास्तव्यास आहेत. लहान मुलांच्या वादातून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला आत्या लीलाबाई सैंदाणे, आत्याचा नवरा आधार शिरसाठ, आतेभाऊ प्रदीप शिरसाठ यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रदीपने लोखंडी सुऱ्याने वार केल्याने फिर्यादीच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्याने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात उशीर झाला असून वरील चार जणांविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम 323,324,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल आला असून तपास पो ना सचिन निकम हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button