Amalner

Amalner:लोकसहभागातून शहरात CCTV चे जाळे पसरवून गुन्हेगारीला आळा बसवणार..उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव

Amalner:लोकसहभागातून शहरात CCTV चे जाळे पसरवून गुन्हेगारीला आळा बसवणार..उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव

अमळनेर शहर व तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. संपूर्ण तालुक्यात मोठया प्रमाणात चोऱ्या होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी कॅमेरा बसविण्याची मोहीम जोमाने सुरू केली आहे.

तालुक्यातील गुन्हेगारी चे वाढते स्वरूप पाहता कडक धोरण पोलिस प्रशासनाने अवलंबावे,अशी मागणी सातत्याने नागरिकांमधून होत होती. त्या पार्श्वभूमीवर अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे अनेक दिवसांपासून शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यापैकी त्यांनी शहरातील संपूर्ण चौक व महत्वपूर्ण विभागात लोकसहभागातून कॅमेरा बसविण्याचा चंग बांधला व त्यांनी तसे नागरिकांना आवाहन केले.त्यांच्या या आवाहनाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनीं भरभरून प्रतिसाद दिल्याने ठीक ठिकाणी कमेरा बसविण्याचे काम जोरात सुरु झाले आहे.

कॅमेरा बसविल्याने शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास व सामाजिक सलोखा राखण्यात मदत मिळणार आहे. याकामी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. कॉलनी परिसरात देखील लोकसहभागातून कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे.एक ही गुन्हेगार निर्दोष सुटणार नाही याकरिता सदर उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.तसेच शहरासह ग्रामीण भागातील गाव खेड्यात देखील ग्राम सुरक्षा दल स्थापून लोकसहभागातून कॅमेराबसविण्याचा मानस आहे. याकरिता नागरिकांनी स्वयं प्रेरणेने कॅमेरा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.याकरिता ज्यांना ज्यांना मदत करावे असे वाटत असल्यास माझ्या 9422246778 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा,असे आवाहन DYSP त्यांनी केले आहे.ज्या नागरिकांनी कॅमेरे लावले त्यांचे स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रमणध्वनी वरून अभिनंदन देखील करत आहेत.

अमळनेर तालुक्याला रेल्वे व महामार्गाद्वारे येणाऱ्याची संख्या अफाट असल्याने येण्याजाण्या साठी प्रवाश्यांना खूप मोठ्या प्रमाणात साधन उपलब्ध आहे. याचाच फायदा परराज्या सह जिल्ह्यातील गुन्हेगार तालुक्यात येवून चोरी,घरफोडी सह दरोडे टाकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा तपासात कालावधी लागत असल्याने समस्या निर्माण होत होती. आता मात्र कॅमेरा बसविल्याने तपास कामात गती मिळून गुन्ह्यास पायबंद घालण्यासाठी मदत होणार असल्याने नागरिकांनी याउपक्रमाचे स्वागत करून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button