Amalner

Amalner: कोरोना Update: अमळनेरकरांनो सावधान..! तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय..!

Amalner: कोरोना Update: अमळनेरकरांनो सावधान..! तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय..!

अमळनेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव सुरू झाला असून तालुक्यात एकूण 7 रुग्ण आढळुन आले आहेत. प्रत्येक कोरोना रुग्णांच्या 10 ते 15 संपर्कात आलेल्या लोकांची आर टिपीसीआर करण्यात आली असून अहवाल येणे बाकी असल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे. आज पान खिडकी परिसरातील एक गरोदर महिला आणि तिची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.घरातील इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदर महिला होम कोरेन्टाईन असून इतर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.देवगाव देवळी येथे देखील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण मध्ये देखील पुन्हा धोका निर्माण झाला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणा
सतर्क झाली आहे.

लसीकरणावर भर..!शाळांमध्ये लसीकरण मोहीम

दरम्यान लसीकरणावर भर दिला जात असून शाळांमध्ये 2007 नंतर जन्मलेल्या विद्यार्थ्यांना लस देण्यात येत आहे. वय 15 ते 18 वयातील मुले मुलींना लस देण्यात येणार आहे.आज साने गुरुजी विद्यामंदिर आणि जी एस हायस्कूल येथे जवळपास 738 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.तर ग्रामीण रुग्णालयात 350 लस देण्यात आल्या असे एकूण जवळपास 1000 लस देण्यात आल्याची माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button