Amalner

Amalner: बापरे..! अरे काय चोरलं जातंय..!नगरपरिषदेने सील केलेल्या आरोप्लँटमधील साहित्याची चक्क चोरी.. नगरसेविका कल्पना पंडीत चौधरी यांनी चौकशी करून कारवाईची केली मागणी

Amalner: बापरे..!अरे काय चोरलं जातंय..!नगरपरिषदेने सील केलेल्या आरोप्लँटमधील साहित्याची झाली चक्क चोरी..

नगरसेविका कल्पना पंडीत चौधरी यांनी चौकशी करून कारवाईची केली मागणी

अमळनेर(प्रतिनिधी) नाशिकच्या प्रथमेश एन्टप्राईजेसने उभारलेल्या आरोप्लँटला जून २०१९ मध्ये पाणी चोरी आणि करार नाम्याचा नियमभंग केल्याने सील करण्यात आले होते. मात्र या सील करण्यात आलेल्या आरोप्लँटमधीलच मशीन आणि साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सील केलेले असतानाही यातून साहित्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
शहरात नाममात्र शुल्क घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नाशिकच्या प्रथमेश एन्टप्राईजेसने नगरपालिकेशी करार करून जानेवारी २०१९ मध्ये आरोप्लँटची उभारणी केली होती. या प्लँटच्या संचालकाने नगरपरिषदेच्या जलवाहिनीवरुन नगरपालिकेची परवानगी न घेता परस्पर अनधिकृतरीत्या मुख्य जलवाहिनीवरुन आरओ प्लॅन्टसाठी नळ कनेक्शन जोडून घेतल्याची तक्रार कल्पना पंडीत चौधरी यांनी नगरपालिकेकडे केली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीती त्यांनी अनधिकृत जोडणी घेतल्याचे लक्षात आल्याने सिंधी कॉलनी येथील आरओ प्लॉन्ट दि.२५/०६/२०१९ रोजी पंचनामा करुन सिल करण्यात आला होता. या आरो प्लँटचा सील तोडण्याचा प्रयत्न केल्यास अथवा पाणी विक्रीचा व्यवसाय केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा तत्काालीन मुख्याधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मात्र हे प्लँट सील केले असातनाही त्यातून साहित्य चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालिकेने काय कारवाई केली
कंपनीचे सिंधी कॉलनी येथील आरओ प्लाँट दिनांक २५/०६/ २०१९ रोजी सील करण्यांत आला होता. सदर कंपनीने न.पा.ची फसवणूक करुन मुख्य जलवाहीनी वरुन परस्पर नळ कनेक्शन करुन सुमारे ६ महिन्यापासून पाणीचा वापर केला होता. तरी संबंधीत प्लॉट सील केला होता. तसेच संबंधित कंपनीकडून दंड घेतला किंवा काय? तसेच संबंधीत सील केलेला प्लॉट कंपनी परस्पर काढून नेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सदर कंपनीने परस्पर सिल तोडल्याचे कळत आहे. प्रत्यक्ष पहाणी करुन योग्य ती तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका कल्पना पंडीत चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button