Mumbai

?मंथन…छाती फुगवून कामावर निघणारा कामगार आता कायमची मान खाली करुन काम करेल….कोरोना आणि मोदींची मेहरबानी…

छाती फुगवून कामावर निघणारा कामगार आता कायमची मान खाली करुन काम करेल….

छाती फुगवून कामावर निघणारा कामगार आता कायमची मान खाली करुन काम करेल…आणि नेहमी भीती मध्येच जगेल.की आज नोकरी आहे उद्या माहिती नाही.कारण अशी भिती निर्माण करणारे कामगार कायदे सरकारने मंजूर केले आहे… कामगारांचा वर्ग मोठ्या प्रमाणात असुन देखील त्याचा विरोध करणारा पक्ष आपल्याकडे नाही आणि आपण मतदान हक्काने करतो…
आज ची हि बातमी प्रत्येक कामगारांसाठी एक धक्काच आहे.कारण कामगारांच्या हिताचा विचार केला गेलाच नाही तर त्यांच्या भवितव्याच्या सोडा त्याच्या उद्याचा भरवसा नाही असे कायदे मंजूर केले आहे…

पण या निर्णयाचा हेतू हा उद्योगधंदे बंद पडू नये असा असु शकतो का ? कारण आर्थिक फटक्या मुळे पूर्ण न होणारा पगार बाजारात लोकान कडे नसलेला पैसा त्या मुळे कुटल्याच गोष्टीला वाव नाही म्हणून बरेचसे उद्योगधंदे बंद पडू शकतात.
हा यामुळे एक गोष्ट मात्र अशी होवू शकते याचा फायदा काही कंपन्या घेतील कर्मचाऱ्यांची पिळवणुक करायला हे नक्की.
डोक्यावर कोरोना आणि पोटावर मोदी बसुन छाती वर ठोकतोय…

कामगार कायद्यात केलेले बदल सगळे कंपनी मालकांच्या ताब्यात दिले आहे…
रोजगार द्यायचा सोडून बेरोजगार करायला हा भाजप पक्ष निघाला आहे…
गरीब हा गरीबच राहिल आणि श्रीमंत हे अजुन श्रीमंत होतील…
सामान्य माणसाच्या हातात काहिच राहिलं नाही…एक कामगार आता गुलाम म्हणून राबेल आणि मालक जे बोलेल ते करावं लागेल…
पण कामगारांची एका प्रकारे हत्याच केली आहे, तो दिवस लांब नाही आता शेतकरी नंतर फाशी घेणारा कामगार असेल…
कामगारांच्या हातातुन त्यांचा हक्क हिसकावून घेऊन त्यांना नको तो फायदा देउन काय उपयोग..
त्यांना डिजिटल पगार व‌ नियुक्ती पत्रा पर्यत त्या कामगाराला टिकवण्यासाठी कायदा केलाच नाही..
जे आता पर्मनंट आहेत त्यांना कॉन्टॅक्ट वर, तसेच त्यांना काढुन टाकण्याचे अधिकार सरकारने कंपनी मालकांना दिले आहेत. जे कॉन्ट्रॅक्ट वर आहेत त्यांची आज फाशी ऊद्या काशी आहे…
गरिबीतून वर जाणारी रेघ या सरकारने उलटी फिरवली आहे..ह्याचा फरक फक्त कामगारांवर नाही तर त्यांच्या कुटुंबावर ही पडेल…

पुंजीवादी अर्थव्यवस्था मुळ घट्ट करतेय देशात त्यात असे कामगार कायदे म्हंटल्यावर नागरीक स्वतंञ कसे म्हणायचे ?
कामगाराने कामच बंद केले तर कंपनी मालक स्वतः काम करणार नाही, त्यासाठी कामगारच लागणार याची जाणीव सरकारला करुन द्यावी लागेल..
कष्टकरी कामगारांच्या विरोधात एवढा निर्दयी निर्णय खुप वेदनादायी आहे या क्षणी प्रत्येक कामगाराला व जी तरुण पिढी कामगार बनण्यासाठीसाठी प्रशिक्षण घेत आहे.. त्यांना सोसावे लागत आहे.

ह्याचा कडक विरोध झालाच पाहिजे केलेले बदल हे पुन्हा पूर्ववत झालेच पाहिजे आणि कामगारांच्या बाजुंनी कायदे मांडले पाहिजे..
आता हे मीडिया वाले 2 दिवस दाखवतील आणि बंद पडतील. आपण कामगार आहोत आपण नेहमी सक्रिय असतो..हे या सरकारला तसेच जगाला शिकवुन दाखवायचे.
भारतातल्या प्रत्येक कामगाराने हे ठरवलंच पाहिजे मग १०×१० च्या गाळ्यात कामाला असु किंवा सरकारी, खाजगी मोठ्या कंपनीत कामाला असु आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी विरोध हा केलाच पाहिजे…
एकदा कामगार जर रस्त्यावर उतरला तर सगळी कामं – गार पडली पाहिजे. मग या खाजगी सरकारी तशीच लहान मोठी इंडस्ट्री कशी आपली भूमिका बजावते व ज्या सरकारने हा कायदा मंजूर केला ते कसे काम करुन दाखवतात हे बघण्यासाठी कामं-गार झालीच पाहिजे…
त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायलाच हवे…

आपला …
आप्पासाहेब शहाजी भोसले
(जिल्हा उपाध्यक्ष)
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button