Amalner

Amalner: घराला लागली अचानक आग..लाखो रु चे नुकसान..

Amalner: घराला लागली अचानक आग..लाखो रु चे नुकसान..

अमळनेर:-येथील स्टेशन रोड ,मिळचाळ येथे एका घराला अचानक आग लागली.
स्टेशन रोड, मिळचाळ येथे अमीनबाई बेसिर यांच्या मालकीचा घराला प्रथम दर्शनी शॉक सर्किट मुळे आग लागल्याचे कळत आहे.सदर घरात राहणारे माया बाई दिनेश गलांडे हे राहत असलेल्या घरास दि.25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अचानक आग लागल्याने सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

सदर आगीत सुमारे दीड लाखाची रोकड देखील जळाली आहे. फ्रीज ,जीवनाश्यक साधने देखील आगीत जळून खाक झाले आहेत. आग अचानक लागल्याने नागरिक व महिलांची मोठी धावपळ उडाली होती.भूषण चौघुले यांनी समयसूचकता दाखवत सामाजिक कार्यकर्ते दिपकभाऊ चौघुले यांचा कडे असलेल्या आग विझवण्याचा फायर पंप आणून तात्काळ आग आटोक्यात आणण्याचे काम केले.त्यामुळे होणारा अनर्थ टळला प्रसंगी आजर शाईक, विकास पुकळे, मंजूर मिस्त्री, आबीद मिस्त्री व परिसरातील बांधवांनी मदत केली. नुकसानस्थळी सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव यांनी भेट नागरिकांचे सांत्वन करत धीर दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button