Dhule

शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार…

शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार…

धुळे शहरात नविन प्रशासकीय संकुलाच्या बांधकामास मंजुरी — आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार धुळे सा.बा.विभागाला पत्र…

असद खाटीक

धुळे दि.२९-१०-२०२० रोजी धुळे शहराचे आमदार फारूक शाह साहेब यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकामाचे मंत्री श्री.अशोक चव्हाण साहेब यांची भेट घेतली असता. सार्वजनिक बांधकामाचे मंत्री साहेबांनी सांगितले कि धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये ल एकाच छताखाली येण्यास मंजुरी देण्यात आळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये साधारणतः ३८ ठिकाणी शासनाचे भाडेतत्वावर घेतलेले वेगवेगळे कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या भाड्या पोटी शासनाला दर माहे ४० ते ५० लाख रुपये द्यावे लागतात. तसेच ही संपुर्ण कार्यालये शहरात दूर दूर पर्यंत विखुरलेली असल्याने जनतेला दैनंदिन कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे जनतेच्या पदरी मनस्तापच येतो तसेच जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो.
जनतेची कामे एकाच छताखाली व्हावी त्यांना विविध ठिकाणी फिरावयास लागु नये यासाठी शासनाने विविध खात्यांची कार्यालये एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी धुळे शहरातील (बस स्थानक व रेल्वे स्थानकाजवळ) सर्वे क्रमांक ३५१२ या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नियोजित जागेच्या ठिकाणी व्हावे जेणेकरून धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येतील व शासनाचा खर्च होणारा पैसा वाचेल म्हणून धुळे शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय संकुलाच्या बंधकामास मंजुरी देण्यात आली आहे. धुळे शहरात नविन प्रशासकीय संकुलाच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे मंजुरी — आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कक्ष अधिकारी यांना आदेशित करत तसे पत्र देखील धुळे सा.बा.विभागाला पत्र देण्यास कळविले आहे. आमदार फारूक शाह यांच्या या चांगल्या उपक्रमास व प्रयत्नांना यश आल्याचंसर्वच स्तरातून चर्चिले जात असून त्यांचे कौतुक देखील होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button