Shirdi

संस्‍थानच्‍या सर्व विभागांंनी स्‍वच्‍छतेची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली

संस्‍थानच्‍या सर्व विभागांंनी स्‍वच्‍छतेची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली

शिर्डी – राहुल फुंदे

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या सर्व विभागांंनी स्‍वच्‍छतेची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली आहे.

संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर व मंदिर परिसरात समक्ष भेट देवुन स्‍वच्‍छता विषयक कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री साईबाबा समाधी मंदिर कळसापासून धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आले. तसेच व्‍दारकामाई, चावडी, गुरुस्‍थान, हनुमान मंदिर, गणपती, शनिदेव व महादेव मंदिरांसह दर्शनरांग, प्रशासकीय इमारत, पिंपळवाडी रोडलगतचे शेड, १६ गुंठेतील सभामंडप, लेंडीबाग हे सर्व ठिकाणे धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात आलेले आहे. गर्दी नसल्‍यामुळे पहिल्‍यांदाच ही संधी मिळाली असून याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे.

संस्‍थानच्‍या सर्वात मोठया साईआश्रम भक्‍तनिवासस्‍थानमध्‍ये पेस्‍ट कंट्रोलचे काम पुर्ण झाले असून संपूर्ण १५३६ खोल्‍या, टेरेस, परिसर लिक्‍वीड सह धुण्‍यात येत आहे. तेथील चादरी, बेडशिट, उशी कव्‍हर आदी धुवून स्‍वच्‍छ करण्‍यात येत आहे. साईआश्रम परिसरातील झाडे-झुडपे ही धुण्‍यात आली असून झाडांची कटींग ही करण्‍यात आलेली आहे. या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येते आहे. याबरोबरच नविन भक्‍त‍निवासस्‍थान ५०० रुम, व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, बस स्‍थानक येथील दोन मजले आदी ठिकाणी ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. याठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदि विभागांनी आपल्‍याशी संबंधीत मेंटन्‍सची कामे हाती घेतली आहे.

संस्‍थानच्‍या वतीने सुमारे ७ एकर परिसरात उभारण्‍यात आलेले भव्‍य असे श्री साईप्रसादालय हे पहिल्‍यांदा बंद ठेवण्‍यात आल्‍यामुळे या ठिकाणाच्‍या परिसरासह किचन, मशिनरी, भोजन हॉल, भोजनासाठी वापरण्‍यात येणारी ताटे, ग्‍लास आदिंची ही स्‍वच्‍छता करण्‍यात येत आहे. तसेच या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्‍मक औषध फवारणी करण्‍यात येत आहे. संस्‍थानच्‍या सर्वच विभागांनी स्‍वच्‍छतेचे कामे हाती घेतले असून स्‍वच्‍छता विभागाचे विभाग प्रमुख अशोक वाळुंज यांच्‍यासह सर्व स्‍वच्‍छता कर्मचारी याकामी विशेष परिश्रम घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button