Akkalkot

अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित व्यवसाय दुकाने बंद ठेवावे : अक्कलकोट व्यापारी महासंघ

अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित व्यवसाय दुकाने बंद ठेवावे : अक्कलकोट व्यापारी महासंघ

प्रतिनिधी कृष्णा यादव, अक्कलकोट

अक्कलकोट कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यवसाय चालू करणेबाबत दिलेल्या आदेशानुसार अक्कलकोट शहरांमधील सर्व दुकानांना दिनांक व वार ठरवून देऊन व्यवसाय करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले होते. तथापि आज दिनांक 11 मे 2020 रोजी नगरपालिकेने ठरवून दिलेल्या व्यवसाय धारकाने दुकाने उघडली असता आज सोमवार असल्याने अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसरातील रोडवर गर्दी उसळली असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये कर्नाटकातून पायी प्रवास करणारे नागरिक, मुंबई पुणे सारख्या अन्य ठिकाणाहून किंवा महानगरातून येत असलेल्या नागरिक हे कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आल्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच अक्कलकोट शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने दिनांक 17 मे 2020 पर्यंत बंद ठेवत असलेबाबत अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांचेकडे व तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांच्याकडे अक्कलकोट व्यापारी महासंघाने दिनांक 11 मे 2020 रोजी अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन साखरे व उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, इतर अनेक पदाधिकारी व व्यापारी बंधू यांचे उपस्थितीत निवेदन सादर केले आहे. तसेच अक्कलकोट शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड व नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत त्यांचे अतिशय उत्कृष्ट नियोजनानुसार भाजीपाला मार्केट चार ठिकाणी विभाजन करण्यात आलेले आहे. तसेच सदर अक्कलकोट शहरातील चारही ठिकाणचे भाजीमार्केट मध्ये व तेथील संपूर्ण परिस्थितीवर अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड व अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशा राऊत हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अक्कलकोट शहरातील नागरिक व दुकानदार भाजीपाला व किराणा बाजार खरेदी-विक्री करताना सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून खरेदी विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोट शहरात भाजीपाला मार्केटचे अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केल्याबद्दल अक्कलकोटचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय तहसिलदार अंजली मरोड व अक्कलकोट नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आशा राऊत यांचे अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button