Akkalkot

अक्कलकोट शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून भाजीपाला व किराणा बाजार खरेदीकरिता उस्फुर्त प्रतिसाद

अक्कलकोट शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून भाजीपाला व किराणा बाजार खरेदीकरिता उस्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी कृष्णा यादव,

अक्कलकोट अक्कलकोट दि.29:- अक्कलकोटचे कर्तव्यदक्ष तहसिलदार अंजली मरोड यांचे आदेशानुसार व तसेच अक्कलकोट नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आशा राऊत यांचे नियोजनानुसार भाजीपाला व किराणा बाजार खरेदी विक्री करिता अक्कलकोट शहरांमध्ये चार ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये नियोजन केलेले आहे. सदर नियोजित ठिकाण राजे फत्तेसिंह क्रीडांगण, एवन चौक,अक्कलकोट, श्री मल्लीकर्जून मंदिरच्या मागील परिसर, अक्कलकोट, अध्यापक विद्यालय D.ed कॉलेज समोरील मैदान अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट समोरील परिसरात या ठिकाणी व अक्कलकोट शहरात विविध ठिकाणी अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे आदेशानुसार उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज अक्कलकोट मधील नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करून भाजीपाला व किराणा खरेदी करणे नागरिकांनी पसंत केलेले आहे. तसेच अक्कलकोट नगरपालिकेकडून नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवून भाजीपाला व किराणा दुकानातून बाजार खरेदी-विक्री करणे कामी व नागरिकांना तोंडाला मास्क लावणे कामी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच ज्या नागरिकांनी मास्क लावलेले नाहीत त्यांना व जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत असताना आढळून आलेले आहेत, त्यांना पोलीस कर्मचारी हे दंडात्मक कारवाई करत असल्याचे दिसून आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button