Nashik

राज्य निवडणूक आयोगाला नाशिक महापालिका प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सादर

राज्य निवडणूक आयोगाला नाशिक महापालिका प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा सादर

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक – महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला गोपनीय पद्धतीने पेन ड्राईव्ह माध्यमातून सादर करण्यात आला आहे.

कच्चा प्रारूप प्रभागरचना आराखडा तपासल्यानंतर पंधरा दिवसात आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होईल प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.

२०११ च्या लोकसंख्येनुसार तीस ते ३२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार शहरात ४३ तीन सदस्यांचे, तर एक प्रभाग चार सदस्यांचा तयार होणार आहे.वाढीव लोकसंख्येचा विचार करून अकरा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ४४ प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरला कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर आयुक्तांमार्फत आराखड्याची छाननी करण्यात आली.

प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या केएमएल फाइल, सर्व प्रभाग, त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरणासह आराखडा पेन ड्राईव्हमध्ये सीलबंद करून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. अशी माहितीमनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button