Korpana

धानोली ग्रामपंचायत चा निर्णय कोरोनाला हद्दपार

धानोली ग्रामपंचायत चा निर्णय कोरोनाला हद्दपार
मनोज गोरे कोपरना
कोपरना : कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत धानोली येथे सर्वप्रथम गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी लसीकरण करून स्वखर्चाने विजय रणदिवे यांनी 62 नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे पाठविले आहेत हे विशेष गावात ग्रामपंचायत तर्फे फवारणी आयुर्वेदिक काढा धानोली सरपंच विजय रणदिवे हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना आपल्या आरोग्य कर्मचारी शिंदे साहेब खाडे कालींदा ताईत प्रतिभाताई मडावी यांनी 35 लोकांना औषधी उपचार करण्यात आशा वर्कर गावातील नागरिकांच्या आरोग्य सुरळीत करण्यात यशस्वी ठरले आरोग्य संबंधित माहिती गोळा करून गावात ताप सर्दी खोकला असणाऱ्यांना गोळ्यांचे वाटप करून गावात कोरोना पॉझिटिव्ह यांचे योग्य असे विलीनीकरण करून त्यांची काळजी घेतली चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये गावातील 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तात्काळ दुसऱ्या दिवशीसुद्धा आरटीपीसीआर चाचणी करून त्यामध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
या सर्वांना घरीच त्यांना विलगीकरण करून उपचार करण्यात आला त्या रुग्णांनी चांगला प्रतिसाद
दिला. त्यामुळे धानोली गावामध्ये आज एकही रुग्ण सध्यास्थितीत आढळून आलेला नाही. सरपंच विजय रणदिवे ग्रामपंचायत धानोली यांनी 27 मे रोजी ग्रामपंचायत धानोली याठिकाणी covid-19चे लसीकरण घेण्यात आलेत यामध्ये गावातील व परिसरातील बऱ्याच नागरिकांनी लस घेतली या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व पत्रकार आशा वर्कर यांचे सत्कार करण्यात आला तसेच धानोली येथील आरोग्य विभाग यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सरपंच विजय रणदिवे यांच्यासोबत सतत सहकार्याची भूमिका दर्शवून गावांच्या आरोग्यासाठी सहकार्य दर्शविले व
यामध्ये गावकऱ्यांची चांगली साथ मिळाल्याचे दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच विजय रणदिवे यांनी सांगितले धानोली गावामध्ये मागील मार्च २०२० पासून समितीने एकूण आतापर्यंत बऱ्याच सभा घेतल्या व त्यामध्ये प्रामुख्याने या महामारी साठी कोणते उपाय करण्यात यावे यावर विचार विनिमय करून तशी अंमलबजावणी करण्यात आली म्हणूनच आज
धानोली हे गाव कोरोणा तुन पूर्ण मुक्त
झाल्याचे दिसते आज झालेल्या लसीकरणाला गावातील बऱ्याच नागरिकांनी महिला पुरुष वर्गांनी प्रतिसाद दिला आजच्या कार्यक्रमाला आरोग्य विभाग मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आशा वर्कर ग्रामपंचायत कडून सत्कार केला धानोली ग्रामपंचायत नेहमीच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असतात या ग्रामपंचायत मध्ये धानोली धानोली तांडा अशा दोन गावांचा समावेश असून व तसेच या ग्रामपंचायत मध्ये धानोली तांडा या वस्ती मध्ये 100% बंजारा समाजाची वस्ती असून गावाच्या विकासा करिता नेहमीच अग्रेसर असतात या गावात अनेक सोयी सुविधा ग्रामपंचायतने निधी देऊन समाजा करिता उपलब्ध करून दिला आजच्या कार्यक्रमाला
ग्रामपंचायत धानोली सरपंच मा.विजय रणदिवे यांचे हस्ते धानोली येथे कोरोना लसीकरण चे उदघाटन सपंन्न
सरपंच विजय रणदिवे
दी.२७/५/२०२१रोज गूरुवार
कोरपना तालुकातील धानोली येथे आज ग्रामपंचायत सरपंच विजय रणदिवे यांचे हस्ते लसीकरणाचे उदघाटन व कोविड योद्धा यांचे सत्कार संपन्न झालेत्यावेळी उपस्थित मान्यवर मा.सौ.डॉ तरोने प्राथमीक आरोग्य केंद्र माडवा,मा.सौ.सूषमाताई च किन्नाके पो .पा.मा.कुबडे साहेब सचिव,मा.जे.डी शींदे साहेब, आर डी.डहाके साहेब, ऐ.एच.किन्नाके साहेब, पी.एम.खाडे सिस्टर. आशाताई सौ प्रेमीलाताई मडावी, सचिन अहीरकर आपरेटर ,संतोष आत्राम परीचर,प्रफुल्ल मडावी विघुत सेवक हे होते सर्व प्रथम फीत कापुन व प्रथीमेचे पुजन करण्यात आले डॉ तरोने यांनी लसीकरणा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत धानोली यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून शाल व श्रीफळ देऊन डॉ तरोने,म्याडम, शींदे साहेब, डहाके साहेब,खाडे सिस्टर, प्रेमीला ताई, रेखबाई, संतोष आत्राम या सर्वाचे सत्कार सरपंच विजय रणदिवे, सचिव कूबडे साहेब यांनी केले
सरपंच्यानी अध्यक्षीय भाषणात बोलताना कोरोना च्या काळात गावात आरोग्य शीबीर व औषध उपचार,सेनिटायझर फवारणी,नाली सफाई, स्वच्छता, जनजागृती शाषनाचे येणारे निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आले तसेच माझ्या गावातील आरोग्य र्कमचारी यांनी खूप मेहनत घेऊन गावाची काळजी घेतली आरोग्य विभागाने नेहमीच धानोली गावाकरीता सहकार्य मिळाले म्हणूनच केलेल्या कामाची एक छोटासा सन्मान करण्याचा भाग्य आम्हाला मिळाले तसेच यापुढेही अशीच सेवा आपल्या हातातून घडत राहो आसे मत व्येक्त करण्यात आले जनतेला लस घेण्याचे आवाहन केले
सदर कार्यक्रमाला जनतेनी उतस्फुद प्रतीसाद दीला सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आशाताई, संतोष आत्राम, प्रफुल्ल मडावी रेखबाई यांनी मेहनत घेतली संचालन श्री डहाके यांनी तर आभार प्रदर्शन सचिन अहीरकर यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button