Ahamdanagar

मढी येथे मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या हस्ते पुजा करून भारत राष्ट्र समीतीच्या प्रचार रथाचा वारू शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उधळला ?

मढी येथे मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या हस्ते पुजा करून भारत राष्ट्र समीतीच्या प्रचार रथाचा वारू शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उधळला ?

सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या चरणी तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (kcr) यांचे खाजगी सचिव शरद मरकड यांच्या हस्ते भारत राष्ट्र समितीच्या प्रचार रथाची विधीवत पुजा करून प्रचार रथाचा” वारू” शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात वेगाने उधळला! आहे संपूर्ण महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकां पर्यंत पोहोचत तेलंगाणा राज्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पोस्टर,पुस्तके, बँनर आणि इतर साहीत्या द्वारे निवडणूक नसतानाही प्रचाराचा नुसता धुरळा उडवला आहे.अनेक गावातील सामान्य जनतेला प्रस्थापित पक्षांनी काय कामे केली आणि भारत राष्ट्र समीती नेमके काय कामे करणार आहे हे या साहीत्या द्वारे संमजून सांगत लोकांची मने जिंकली आहेत. अनेक गावातील सामांन्य कार्यकर्ते या पक्षाच्या नवीन नेत्याकडे आकर्षित झाले आहेत.या प्रचार रथाच्या उद्घाटनाप्रसंगी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख संदिप राजळे यांनी त्यांच्या पक्षाची भुमिका समजावून सांगितली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button