Akkalkot

पुणे-मुंबईच्या लोकांना अक्कलकोट तालुक्यातील कुठल्याही गावात प्रवेशबंदी

पुणे-मुंबईच्या लोकांना अक्कलकोट तालुक्यातील कुठल्याही गावात प्रवेशबंदी

प्रतिनिधी कृष्णा यादव,

अक्कलकोट दिनांक 12 आता अक्कलकोट तालुक्यातील कुठल्याही गावात पुणे-मुंबई सह बाहेरच्या लोकांना अजिबात प्रवेश द्यायचा नाही, जर असे कुणी आले तर त्यांना अक्कलकोट येथील तात्पुरता निवारा केंद्रात क्वारंटाईन करावे अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा तहसीलदार अंजली मरोड यांनी दिला आहे.

सोशल डिस्टन्स ठेवून रविवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीही उपस्थिती होती. अक्कलकोट तालुक्यात आजपर्यंत 17853 लोक पुणे-मुंबई येथून आलेले आहेत. तर शनिवारी एका दिवसात 56 लोक आले असून हे धोकादायक आहे. पुणे मुंबईच्या लोकांना गावात अजिबात प्रवेश द्यायचा नाही अक्कलकोट मधील निवास सेंटरमध्ये राहिला सांगावे. तसेच तात्पुरता निवारा केंद्र 41 लोक असून मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह 50, खेडगी कॉलेज येथे 100 लोकांची सोय होऊ शकते. सर्व सीमा बंद असून सहकार्य नाही केले तर गुन्हा दाखल होईल, सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.

तसेच विविध वाहन चालक जे बाहेरगावी जाताना त्यांनी गावांमध्ये होम क्वारंटाईन करा रहावे किंवा ग्रामपंचायत शाळेत राहावे, बोरोटी बुद्रुक बोरोटी खुर्द व हनूर गाव गावकर यांनी दत्तक घेतलेले असून हा उपक्रम चांगला असून पुढचे 15 दिवस गावकरी यांनी गावकऱ्यांना संभाळावे असे आवाहन केले आहे.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रशासनाचे उपायोजनानुसार वागून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. बाहेरून तालुक्यात आलेले आहेत त्यांनी स्वतःहून होम क्वारंटाईन करून घ्यावे कम्युनिटी संक्रमण होऊ नये म्हणून प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाची उत्तम व्यवस्था आहे जे सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल कुठलीही गोष्ट गैरसोय होणार नाही, बाहेरच्या व्यक्तींना पण अन्नधान्य कमी पडू देणार नाही, गैरसोय होऊ देणार नाही, बाहेर पडू नका, बाहेर पडल्यास मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे, असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button