Chandwad

अभाविपच्या जनजाती गौरव यात्रेस उत्साहात प्रारंभ

अभाविपच्या जनजाती गौरव यात्रेस उत्साहात प्रारंभ

उदय वायकोळे चांदवड

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक, आयोजित जनजाती गौरव यात्रेस आज मोठ्या उत्सवात चणकापुर येथून सुरवात झाली.
अभाविप चे अखिल भारतीय जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख गोविंद भाई नायक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे धर्मजागरण विभाग संयोजक प्रदीप आबा बच्छाव, भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदार नाना आहेर, अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जनजाती गौरव यात्रा प्रमुख प्रतिक पावडे, अभाविप नाशिक महानगर अध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र देशमुख यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून यात्रेच्या रथाची पूजा केली.
8 नोव्हेंबर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती ते 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने अभाविप नाशिक तर्फे कळवण तालुक्यातील चणकापूर येथून ते अकोले तालुक्यातील देवगाव पर्यंत जनजाती गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर यात्रेचा शुभारंभ चणकापूर येथे आज पार पडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करतांना अभाविपचे अखिल भारतीय जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख गोविंद भाई नायक म्हटले की जनजाती क्रांतिकारकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेला योगदान न विसरण्यासारखे आहे. आपण सर्व मिळून जनजाती समाजाच्या परंपरा त्यांची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी पुढे येऊया असे आवाहन देखील त्यांनी केले.
समारंभाचे प्रमुख वक्ते प्रदीप आबा बच्छाव यांनी चणकापूर चा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास उलगडून सांगितला. तसेच चणकापूर येथील जनजाति बांधवांनी कशाप्रकारे स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देऊन कार्य केले याची माहिती दिली. तसेच भगवान बिरसा मुंडा यांनी धर्मरक्षणासाठी कशाप्रकारे कार्य केले याची देखील माहिती दिली, धर्म विरोधी कारवाया करणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांनी उभारलेला लढा अवर्णनीय आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले, आपण या सर्व त्यागापासून प्रेरणा घेऊयात असे यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराज भामरे यांनी केले, यावेळी प्रा,देशमुख, श्री केदार नाना आहेर, दीपक वेढणे यांनी मनोगत व्यक्त करत यात्रेस शुभेच्छा दिल्यात, सूत्रसंचालन प्रतिक पावडे यांनी केले. यावेळी अभाविप नाशिक जिल्हा संयोजक यश मोरे, अर्थ व जनसंपर्क प्रमुख धनंजय रासकर, नाशिक महानगर मंत्री सौरभ धोत्रे, अजय बहिरम, साहिल गोमसाळे, लक्ष्मण भुसारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button