Baramati

बारामती तालुक्यातील तीन गावातील सर्व्हेमध्ये आत्तापर्यंत आढळले 46 कोरोनाग्रस्त

बारामती तालुक्यातील तीन गावातील सर्व्हेमध्ये आत्तापर्यंत आढळले 46 कोरोनाग्रस्त

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामती तालुक्यातील गावागावांमध्ये सामूहिक संसर्ग झाल्याचे आज सिद्ध झाले आहे. गुनवडी,पणदरे व माळेगाव या तीन गावात केलेल्या सर्व्हेक्षनातून आढळलेल्या सशीयतांची तेथेच चाचणी केली.तर तीन गावात मिळून तब्बल 46 जण कोरोनाग्रस्त आढळले.अजूनही चाचण्या सुरूच आहेत.संध्याकाळी उशिरापर्यंत तेथील चाचण्या पूर्ण होतील.

बारामती तालुक्यात महसूल,आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या सयूंक्त अक्टिव्ह सर्व्हे मध्ये आत्तापर्यंत 32 हजार लोकांचे सर्व्हेक्षण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.आज झालेल्या सर्व्हेक्षणांमुळे गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आहेत हे सिद्ध झाले असून आत्ता सर्वच गावामध्ये रॅपिड अँटिजेंन चाचण्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्याची व तशा प्रकारची शिबीरेच घेण्याची गरज असल्याचे सिद्ध झाले आहे.

संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत पणदरे गावामध्ये आढळलेल्या 71 संशियातीच्या रॅपिड अँटिजेंन चाचण्या गावातच घेण्यात आल्या. त्यामध्ये 18 कोरोनाबधित आढळले आहेत.अजूनही तेथे कोरोनाची रॅपिड अँटिजेंन चाचणी सुरू आहे.आणखी 40 हुन अधिक लोकांची तपासणी सुरू असल्याची माहिती डॉ खोमणे यांनी दिली.
माळेगावमध्ये जवळपास 20 हजार लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.तेथे 120 हुन अधिक संशयित आढळले,त्यापैकी 80 जणांची चाचणी संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत पूर्ण झाली असून त्यामध्ये 20 जण कोरोनाबधित आढळले आहेत.अजूनही तेथे कोरोनाची रॅपिड अँटिजेंन चाचणी सुरू आहे.

गुनवडीमध्ये दुपारपासून सर्व्हेक्षण सुरू झाले.तेथे संशयित आढळलेल्या 45 जणांची आत्तापर्यंत चाचणी पूर्ण झाली असून तेथे 8 जण कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत.अजूनही गुनवडीमध्ये अँटिजेंन चाचणी सुरू आहेत.

50 कुटूंबामागे एक पथक अश्या पद्धतीने हे सर्व्हेक्षण झाले.यामध्ये शिक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.तहसीलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे,जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी तावरे आदींसह स्थानिक पदाधिकारी, गावचे सरपंच, सदस्य यामध्ये सहभागी होते.पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्व्हेक्षनास भेट देऊन पाहणी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button