Pandharpur

औरागाबाद येथे राष्ट्रवादी पक्षाची व्यापार उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांची आढावा बैठक संपन्न

औरागाबाद येथे राष्ट्रवादी पक्षाची व्यापार उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांची आढावा बैठक संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मराठवाड्यातील संपर्क प्रमुख तथा माजी मंत्री व माजी खासदार मा .जयसिंगराव गायकवाड पाटील यांचे प्रमुख उपस्थित व मराठवाडा पदविधर मतदार संघाचे विदयमान आ . मा .सतिस चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व् राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मा . कैलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष उदयोग व व्यापार विभाग मा . नागेश फाटे यांनी आढावा बैठक घेतली .यावेळी औरंगाबाद हे इंडस्ट्रीय उदयोगात आघाडीवर असून येथील उदयोजगकांना पक्षात काम करणेची संधी देणे त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे त्याच बरोबर या जिल्ह्यात जगप्रसिद्ध लेणी व ऐत्यासिक स्थळे असून या ठिकाणी छोटे व्यावसायिक ते रिर्साट रेस्टॉरंट मोठी एम आय डी .सी प्रकल्प असून या क्षेत्रातील संघटन कौशल्य असणारे कार्यकर्ते शोधून त्यांना राष्ट्रवादी पक्षात सामावून घेवून त्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या व्यवसायाला चालना देणे व पक्ष संघटन मजबूत करणे यावर नागेश फाटे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेवून सविस्तर चर्चा केली यावेळी किसान सभा उपाध्यक्ष मा . शिवाजी बनकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मा .पांडुरंग तांगडे पाटील, सरचिटणीस तथा संपर्क मंत्री संघटक सचिव सलिम शेख, सोशल मिडीया अध्यक्ष मा .विलास मगरे, पंढरपूर ता .उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button