Pandharpur

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव आनंदी वातावरणात संपन्न

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव आनंदी वातावरणात संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

संगोला: फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती. एखाद्या व्यक्तीचे कार्य किती वर्ष समाज लक्षात ठेवतो अशा या थोर धैर्यशील, बुद्धिमान, राजनीती तज्ञ, श्रीमंत योगी ,अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव प्रशालेत साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा रुपनर हे होते. त्यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संस्थेच्या डायरेक्टर सौ सारिका रुपनर , डॉ.सौ सुप्रिया लवटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय बैस ,पॉलिटेक्निकलचे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनीही शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. यामध्ये पहिली ते तिसरी वर्गातील मुलांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून रॅम्पवॉक करत संवाद सादर केले. पाचवी ते सातवीतील मुलांनी पोवाडे सादर केले ,तसेच इयत्ता सहावीतील मुलींनी शिवजन्म सोहळ्याचा प्रतीकात्मक देखावा सादर केला. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम सादर केली. तसेच नववीतील मुलांनी बहारदार नृत्य सादर केले. शाळेतील इतर सर्व मुलांनी विविध प्रकारच्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून शाळेत उपस्थिती लावली. प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांनी ही पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांनी शिवजयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पाहण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणात शाळेत आपली उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी प्राप्ती आलदर व कुमार प्रसाद आलदर यांनी केले. हा कार्यक्रम संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला .या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button