Paranda

मनाई आदेश झुगारून दुकान सुरू ठेवले परंडा येथील सराफ दुकानदारा विरूध्द गुन्हा दाखल…

मनाई आदेश झुगारून दुकान सुरू ठेवले परंडा येथील सराफ दुकानदारा विरूध्द गुन्हा दाखल…

परंडा : कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी दुकान उघडण्यास मनाई असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परंडा येथील सराफ हिरालाल जनार्धन पेडगावकर ( खर्डेकर ) दुकानदारा विरूध्द दिनांक ५ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी हिरालाल जनार्धन पेडगावकर याने दिनांक ५ जुन रोजी परंडा येथील बस स्थानक जवळ असलेल समर्थ ज्वेलर्स दुकान उघडले तसेच मास्क न लावता कोरोना रोगाचा संसर्ग पसरन्याचा संभव असताना लोकांच्या जिवीतास धोका होईल असे कृत्य केल्याचे पोलिसांना आढळून आले .
जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी काढलेल्या कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघण केल्याने
पो कॉ . प्रशांत शेंदारकर यांच्या फिर्यादी वरून . पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्य आदेशाने आरोपी हिरालाल पेडगावकर विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हाचा पुढील तपास महिला पोलिस नाईक मुल्ला यांचे कडे देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button