Pandharpur

चार पक्ष फिरून आलेले कल्याण काळें होणार का राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष

चार पक्ष फिरून आलेले कल्याण काळें होणार का राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुधसंघ, बँका, कारखाने, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा यांमधिल प्रत्येक निवडनुकांमध्ये अग्रस्थानी असणारी व शरद पवार यांच्याशी थेट नाळ असलेला सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मागील दोन तीन वर्षांपासून बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे त्यातच अता सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची बळीरामकाका साठे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नविन सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी पंढरपूर तालुक्यातील कल्याण काळे यांचे नाव पुढे येत असल्याच्या चर्च्या सुरू असतानाच त्यांना पक्ष्याअंतर्गतच मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्याचे दिसून येत आहे तर काही जन खाजगीत बोलताना कल्याण काळे हे चार पक्ष फिरून अत्ता कुठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत त्यामध्येही ते आल्यापासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात पक्ष्याअंतर्गत वाद विवाद झाल्याने राज्यभर पक्ष्याच्या व महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तसेच जिल्ह्यात आजपर्यंत पडत्या काळातही पक्ष्याचे एकनिष्ठपणे काम करणारी अनेक जेष्ठ व अभ्यासु मंडळी आहेत त्यामुळे जिल्ह्यात पक्ष आधीच बॅकफूटवर गेलेला असताना जिल्हाध्यक्ष पदी कल्याण काळे यांची निवड झालीतर पक्ष आणखी खालची पातळी गाठेल त्यामुळे पक्ष वरिष्ठांकडून जिल्हाध्यक्ष पदाबाबत थोडा उशीर का होईना परंतु योग्य व्यक्तीकडच सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची धूरा देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांमधून चर्चा होताना दिसुन येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button