Ahamdanagar

शंकरवाडीच्या जनता दरबारात तक्रारीच्या पावसातही डिजिटल सातबाऱ्याच्या उताऱ्याचा ना.प्राजक्तदादा तनपुरेच्या हस्ते शुभारंभ संपन्न ?

शंकरवाडीच्या जनता दरबारात तक्रारीच्या पावसातही डिजिटल सातबाऱ्याच्या उताऱ्याचा ना.प्राजक्तदादा तनपुरेच्या हस्ते शुभारंभ संपन्न ?

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडीतील ना.प्राजक्तदादा तनपुरेच्या जनता दरबारात अक्षरशः असंख्य तक्रारीचा पाउस पडला.सर्व तक्रारीचे निरसन झाल्यावर शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा देण्याचा शुभारंभ पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर यांच्या उपस्थितीत आणि ना.तनपुरेच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजीराव दहातोंडे हे होते. शंकरवाडीचे सरपंच अशोक दहातोंडे यांनी रुपेवाडी आणि शंकरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक अडी अडचणी सांगितल्या. ना.तनपुरेनी त्या सर्व अडचणी सोडवन्याचे आश्वासन दिले. विषेशतः रुपेवाडी गावातील गावठाणात एका शेतकऱ्यांने लोहारवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अडवून धरला आहे त्या शेतकऱ्याला कायदेशीर मार्गाने नोटीस देऊन रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच भिल्ल समाजातील लोकांना रुपेवाडी येथे पवार वस्तीवर स्वतंत्र विद्दूत डीपी देण्यात येणार आहे हे सांगितले.प्रथमच गावात येणाऱ्या मंत्री महोदयांचे फटाक्यांच्या आतषबाजीत वाद्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. दहातोंडे परिवारातील सवाष्ण महिलांनी औक्षण केले. या जनता दरबारासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राजुमामा तागड,राहुल गवळी, भागिनाथ गवळी, एकनाथ झाडे,संभाजी पालवे, बद्रीनाथ सोलाट,नामदेव सोलाट,बाळासाहेब घुले,पोपट जाधव,आंबादास डमाळे, पिनू मुळे,राजू शेख, मयुर तागड,वैशाली गव्हाणे,अमोल वाघ,उद्धव दुसंग,शिवाजी आठरे,निशिकांत पुंड,कानिफ जाधव,गणेश जाधव,बबन चोभारे,दादा वांढेकर,चांगुलपायीआणि सर्व खात्याचे शासकीय अधिकारी यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button