sawada

सावदा येथील कुलदैवत निमजाय माता मंदिरचा रस्ता आमदार निधीतून करून द्यावा : शिवसेनेची मागणी

सावदा येथील कुलदैवत निमजाय माता मंदिरचा रस्ता आमदार निधीतून करून द्यावा : शिवसेनेची मागणी

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे शेत शिवारात जागृत कुलदैवत निमजाय माता मंदिर असल्याने येथे महिला पुरुष वृद्ध भक्तांना दर्शनासाठी तसेच मान पूर्ण करण्यासाठी सदरील मंदिरावर ये – जा करण्यासाठी अनेक वर्षापासून व्यवस्थित रस्ता नसल्याने त्यांना नाईलाजास्तव भाविकांना येथील शेतातून खचलेल्या रस्त्यातून तारेवरची कसरत करून जावे लागते हे मात्र खरे आहे.

तसेच पावसाळ्याच्या दिवसात व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना जवळपास एक किलोमीटर पेक्षा जास्त पावसाचे पाणी साचलेल्या शेतातुन चिखलमय वातावरणात मोठी कसरत करून पायी जावे लागते सदरील जागृत मंदिरात संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त व श्रद्धालू भाविक दर्शन व आपापले मान पूर्ण करण्यासाठी येतात. तसेच या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव, लग्न समारंभ इतर कार्ये ही भाविकांकडून होत असतात

परिणामी सदरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना या खटलेल्या रस्त्या अभावी अनेक वर्षापासून ये – जा करण्यासाठी होणारी समस्या कायमची दूर व्हावी म्हणूनच याकडे जातीने लक्ष देऊन सावदा शिवसेनेच्या वतीने येथील कुलदैवत निमजाय माता मंदिराजवळ जाण्या कामी रस्ता आमदार निधीतून करून द्यावा अशी रास्त मागणी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून त्यावर सावदा शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेसी उर्फ बद्री, भरत नेते, उप तालुका प्रमुख धनंजय चौधरी, शहर सचिव शरद भारंबे, शाम पाटील माजी शिवसेना प्रमुख मिलिंद पाटील सह नागरिकांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button