Ahamdanagar

?मोठी बातमी..गुप्तांगात काठी आणि मिरची घालणाऱ्या पोलिसांवर ३०२ चा गुन्हादाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..स्वागतार्ह निकाल

?मोठी बातमी..गुप्तांगात काठी आणि मिरची घालणाऱ्या पोलिसांवर ३०२ चा गुन्हादाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश.. स्वागतार्ह निकाल

अहमदनगर अनेक ठिकाणी अनेक पोलीस ठाण्यात अनेक पारधी अत्याचाराला बळी पडले आणि अनेक महिलावर बलात्कार झालेत.दुर्दैवाने पारधी समूहाला समाजाची सहानुभूती नाही.त्यामुळे अनेक अत्याचार तसेच दडपले गेले.गिरीश प्रभुणे यांच्या पारधी पुस्तकात अशा अनेक पोलिसी अत्याचाराच्या कहाण्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील सुमन काळे या महिलेला पोलिसांनी पकडून तिला बेदम मारहाण केली व तिच्या गुप्तांगात काठी घालणे मिरची टाकणे इतके नीच प्रकार केले. २००७ साली घडलेल्या या प्रकारात आज १३ वर्षांनी उच्च न्यायालयाने निकाल दिला व पोलीस अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
हा अत्यन्त स्वागतार्ह निकाल आहे. यातून इथून पुढे कस्टडीत होणारे गरिबांचे मृत्यू व बलात्कार थाम्बतील. या निकालाची प्रत राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवायला हवी म्हणजे किमान कस्टडी मृत्यूतून गरिबांची सुटका होईल
या केसमध्ये शेवटपर्यंत ठाम राहिलेला सुमन काळे यांचा मुलगा साहेबराव ,भाऊ गिरीश, त्यावेळचे CID चे वकील शिवाजी काळे व या सर्वांच्या पाठीशी उभे राहिलेले भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते किसन चव्हाण या सर्वांचे अभिनंदन

*हेरंबकुलकर्णी*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button