Paranda

आमदार प्रा तानाजीराव सावंत यांना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र _ . जिल्हा प्रमुख लटके

आमदार प्रा तानाजीराव सावंत यांना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र _ . जिल्हा प्रमुख लटके

खोटी बातमी प्रसारीत केल्याबद्दल टी.व्ही ९ चा निषेध

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा )दि . ०८

शिवसेना नेते आमदार प्रा तानाजीराव सावंत यांनी धाराशिव जिल्हयाचा दौऱ्यात पक्ष विरोधी एक ही शब्द काढला नसताना देखील शब्दांचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले .

शनिवार दि. ८ रोजी परंडा येथिल शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जिप चे कृषी व पशु संवंर्धन सभापती तथा जिल्हा समन्वयक दत्ता साळूंके , उप जिल्हा प्रमुख दत्ता मोहीते , तालुका प्रमुख आण्णा जाधव , भुम प.स चे उप सभापती गुंजाळ , माजी शहर प्रमुख शाम मोरे , दत्ता रणभोर उपस्थित होते .

या वेळी लटके म्हणाले की जिल्हयातील शिवसैनिकांशी संवाद साधन्या साठी आमदार सावंत यांनी तुळजापुर येथून जिल्हा दौरा सुरू केला होता या दौऱ्यात सावंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटले होते की मराठवाडयाच्या हक्काच्या पाणी आणने माझे स्वप्न असुन मंत्रीपद मिळाले नसले तरी पाण्या साठी मराठवाडयातील सर्व आमदारांना एकत्र करून पाणी आणन्या साठी प्रयत्न करू तसेच शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पाण्याच्या प्रश्ना साठी मला राजीनामा देण्याचे सांगीतले तर देईन मात्र हक्काच्या पाण्या साठी प्रयत्न करत राहणार असे म्हटले होते मात्र प्रसार माध्यमाने चुकीचे वृत्त प्रसारीत केले आहे असे लटके यांनी या वेळी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button