Pandharpur

गादेगाव येथील आशा सेविकां व गरजू शेतमजुरांना मनसेची मदत

गादेगाव येथील आशा सेविकां व गरजू शेतमजुरांना मनसेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर,ता.18- सर्वसामान्य लोकांच्या घरोघरी जावून आरोग्याची काळजी घेणाऱ्या गादेगाव (ता.पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका व गरीब कुटुंबाना मनसेच्या वतीने आज धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञा व्यक्त केली.येथील ग्रामपंचयातीचे सदस्य गणेश बागल आणि गावकामगार तलाठी श्रीकांत कदम यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत अाशा सेविका आजही आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागातील लोकांच्या घरोघरी जावून आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याचे हे काम खूप मोठे आणि महत्वाचे आहे.त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञा म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सेविका व गरीब कुुटुंबाना गहू, तांदुळ, साखऱ, चहा पावडर,मास्क,सॅनिटायझरसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांना ही आज गादेगाव चौकातील फूट रस्ता चेक पोष्टवरील पोलिस बांधवांना मनसेच्या वतीने पाणी, बिस्कट,मास्क चे वाटप करुन पोलिसां प्रती असलेल्या कृतज्ञेची भावना व्यक्त केली.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधान सभा अध्यक्ष अनिल बागल, शिवरत्न काॅलेजचे संस्थापक गणपत मोरे, वैद्यकीय अधिकारी अनिशा तांबोळी, जेम्स फिलिप्स, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, अर्जून जाधव,ओंकार कुलकर्णी,सागर घोडके,संजय रणदिवे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button