बोदवड/जळगांव

बोदवड मध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ पोलिसांची चोरांशी सलगी चा संशय? .

बोदवड मध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ पोलिसांची चोरांशी सलगी चा संशय? .

सुरेश कोळी

बोदवड सह तालुक्यांमध्ये चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पोलिसांबद्दल जनतेमध्ये संभ्रम व्यक्त केला जात आहे जनतेमध्ये चर्चेला उधाण आहे की पोलिसांच्या चोरासी झाली आहे कुठेतरी सलगी आहे की काय म्हणून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे अशा आशयाचे वृत्त जनतेमध्ये चर्चिले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यामध्ये मागील एका महिन्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेणुकादेवी विद्यालयांमध्ये मोटर चोरीचे प्रकरण, जामठी रस्त्यावर दोघांनी यांचे किराणा दुकान फोडण्याचे प्रकरण, तसेच अनेक लोकांच्या घराजवळून मोटरसायकली गायब आहेत. बँकेचा दरोडा प्रकरण असो इतर कोणती वस्तू चा प्रकरण असो बोदवडमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे जनतेमध्ये चर्चेला उधाण आहे कि, पोलिसांचे आणि चोरांचे काहीतरी सलगी आहे. म्हणून चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे जनतेचा विश्वास पोलिसावर उठत आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली प्रतिमा मलिन न होऊ देता चोरीचे प्रमाण थांबवावे अशी मागणी जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button