Latur

दिशा प्रतिष्ठानचे काम दिशादर्शक – रमेश बियाणी

दिशा प्रतिष्ठानचे काम दिशादर्शक – रमेश बियाणी

लातूर प्रशांत नेटके

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने काम करत असणाऱ्या दिशा प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते संपन्न झाले. दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना व रुग्णांना होत असलेले सहकार्य हे दिशादर्शक आहे असे उदगार उद्घाटन प्रसंगी रमेश बियाणी यांनी बोलताना व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे सह्याद्री हॉस्पिटल चे संचालक डॉ हनुमंत किनिकर यांनीही प्रतिष्ठानचे आरोग्य क्षेत्रामध्ये होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत रुग्णसेवेच्या बाबतीत जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केले.

उद्घाटन समारंभानंतर दयानंद महाविद्यालयातील श्रेया सूर्यवंशी, बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजची पूजा पांढरे, राजश्री शाहू महाविद्यालयाची अंजली हारडे व जिल्हा परिषद चांडेश्वर या शाळेतील चौथी वर्गात शिक्षण घेत असलेली कु जानवी जाधव या गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता 45 हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

यापुढीलही काळात अधिक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्रतिष्ठान कायम कटिबद्ध असेल असे उद्गार याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे सल्लागार अभिजीत देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा सत्कार तालतपस्वी पं.शांताराम चिगरी गुरुजी हा गुरु ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन डॉ अशोक पोद्दार व डॉ.चेतन सारडा यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे अभिजीत देशमुख, प्रसाद उदगीरकर, किशोर भुजबळ, अविनाश कामदार यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनेश गोजमगुंडे, प्रकल्प समन्वयक ॲड. वैशाली यादव, अजय शहा, इसरार सगरे , विष्णुदास धायगुडे,आदींनी परिश्रम घेतले.

डी.आर.इव्हेंट चे संचालक पप्पू घोलप यांना यावेळी प्रतिष्ठानचे निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.लातूर मल्टी स्टेट बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे सचिव जब्बार पठाण यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button