Yewala

?️ येवला,अंदरसुल येथे लग्न जमत नसल्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

येवला,अंदरसुल येथे लग्न जमत नसल्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..!

येवला प्रतिनिधी , विजय खैरनार

येवला, ता.३०: तालुक्यातील अंदरसुल येथे शेतात राहात असलेल्या गणपतराव जाधव यांचा मुलगा,अंदरसुल मध्ये बऱ्याच दिवसा पासून मेनरोडला मोबाईल शॉपी चे दुकान चालवत होता,बऱ्याच ठिकाणचे स्थळ बघितले परंतु लग्न न जमल्याने अमोल गणपत जाधव वय २१, रा.अंदरसुल यांने राहत्या घरी लग्न जमत नसल्याच्या करणा वरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून युवकाचा मृतदेह पोस्टमार्टम साठी येवला ग्रामीण रुग्णालयात नेण्‍यात आला आहे.त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असुन घटनेची सखोलपणे पुढील तपास येवला ग्रामीण पोलीस ए.एस.आय. तांदाळकर,पो.कॉ. हेंबाडे हे करत आहे,अमोलने अचानकपणे गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button