Yewala

येवला पंचायत समितीचे सभापती कर्तव्यदक्ष प्रवीण गायकवाड यांनी शेतात जाऊन कासरा हातात घेऊन कोळपणी केली

येवला पंचायत समितीचे सभापती कर्तव्यदक्ष प्रवीण गायकवाड यांनी शेतात जाऊन कासरा हातात घेऊन कोळपणी केली

प्रतिनिधी , विजय खैरनार

येवला, ता. ०४: यंदा राज्यात मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके बहरू लागली आहेत. शेतकरी पिकांची कोळपणी करू लागला आहे. पण शेतकरीच नाही तर खुद्द सभापती देखील पिकांची कोळपणी करू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी शेतात जाऊन कासरा हातात घेऊन कोळपणी केली.

देश आणि राज्य कोरोणाच्या संकटात सापडले असताना आपल्या बळीराजाने कष्ट करत कोणालाही उपाशी राहू न देण्यासाठी विडा उचलला आहे.शेतकरी पहिलेच कोरोनाच्या संकटात असून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोळपणी करायला शेतात आल्याचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी यावेळी सांगितले. शेतामध्ये पिकाची कोळपणी करताना कोळपणी केल्यामुळे दोन्ही पिकांमधील तन असेल ते नष्ट होऊन शेतकराला येणारा निंदनी चा खर्च व मजुरांवर होणारा खर्च हा कमी होतो पिकाचा पोतही सुधारतो अंतर्गत मशागत होते पीक वाढीसाठी हे खूप खूप महत्त्वाचे आहे व हा आनंद वेगळा असतो शेतकऱ्याचा आणि निसर्गाचा असलेलं नातं खूप आनंद आणि सुखकर असतं या नात्याचा गोडवा माणसाच्या आयुष्यातील आनंद हा खूप वेगळा असतो शेतकरी जीवन हि खूप कष्टमय आहे मी स्वतः शेतात काम करून जो आनंद मिळतो तो आनंद इतर कुठेही मिळू शकत नाही आणि आपण केलेले कामाचं समाधान हे खूप मोठं असतं
असे प्रतिक्रिया सभापती प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button