Yewala

येवला तालुक्यात शासकिय बाजरी खरेदी केंद्र सुरू करावे –अॅड.माणिकराव शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे मागणी

येवला तालुक्यात शासकिय बाजरी खरेदी केंद्र सुरू करावे –अॅड.माणिकराव शिंदे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे मागणी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक- :येवला तालूक्याच्या इतिहासात आज पर्यंत शासकिय बाजरी खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. मात्र या वर्षी खरिप हंगाम २०२० -२१ मध्ये तालूक्यात ८ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असुन आज रोजी ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत असुन खरिपाची बाजरी बाजारात विक्रीसाठी आली तर प्रति क्विंटल १००० रुपयाच्या आत बाजरी धान्याची विक्री होणार आहे. या कवडिमोल भावात बाजरीच्या पिकाचा उत्पादन खर्चही निघणार नाही.

शासकिय भरड धान्य खरेदी योजने अंर्तगत आधारभुत किंमत २१५० रुपये दराने येवला तालूका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासनाने शासकिय बाजरी खरेदी केंद्र सुरू करुन बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दयावा अशी मागणी जेष्ठ नेते अॅड माणिकराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे ईमेल निवेदनाव्दारे केली आहे.

बाजरी धान्याचा शासकिय हमी भाव (२१५०) व सध्याचा चालू बाजारभाव (१०५०) यातील तफावती नुसार शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ११०० रुपयाचे नुकसान होणार आहे. येवला तालूका कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार ८ हजार हेक्टर खरिप बाजरीची पेरणी झाली असुन एकरी १३ क्विंटल उत्पादनाची सरासरी या वर्षी राहिल. ८ हजार हेक्टर पैकी साडेपाच हजार हेक्टरचीच अपेक्षित बाजरी उत्पादन विक्रीसाठी बाजारात आल्यास १७८७५० क्विंटल इतकी आवक राहील.

शासकिय आधारभुत किंमतीने बाजरी धान्याची खरेदी शासनाने केली नाही तर आधारभुत बाजरीची किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रति क्विंटल ११०० रु. नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागेल. परिणामी येवला तालूक्यातील बाजरी धान्य उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध १७८७५० क्विंटल बाजरी धान्याच्या माध्यमातून २० कोटी रुपयाचा फटका बसणार आहे.

आज बाजरी पिकाचा उत्पादनाचा खर्च एकरी १७५०० रूपये इतका असुन आजच्या बाजारभावाप्रमाणे फक्त १३६५० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाजरी पिकात शेतकऱ्यांना घरातून पैशे घालावे लागणार आहे. हि बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा असुन शासनाने येवला तालूका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकिय बाजरी खरेदी केंद्र या वर्षापासुन सुरू करून २१५० या दराने शेतकऱ्यांची बाजरी खरेदी करावी अशी मागणी अॅड. माणिकराव शिंदे यांनी केली आहे. बाजरी खरेदीसह या वर्षापासुन येवला तालूक्यात ज्वारी उडिदची ही शासकिय खरेदीला सुरुवात करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली असुन शेतकऱ्यांचा मुग तयार झाला असून मुग खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button