Yewala

येवलेकरांचे पाण्याचे संकट टळले.

येवलेकरांचे पाण्याचे संकट टळले

प्रतिनिधी-शांताराम दुनबळे

नाशिक-:येवला शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव कोरडा पडल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट आले होते, परंतु मंत्री छगन भुजबळ येवले करानी केलेल्या पाठपुराव्यांनतर पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने येवलेकरांवरचे पाण्याचे संकट टळले आहे. गुरुवारी सायंकाळी पाणी तलावात पोहचल्याने आता शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकेल.

शहराला गंगासागर लगतच्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. पालखेड जलसंपदा विभागातर्फे मार्चच्या शेवटी दिलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन यातून पाणी साठवण तलाव भरून देण्यात आला होता. पालिकेच्या टप्पा क्रमांक दोन साठवण तलावात सुमारे ४४ दशलक्ष घनफूट पाणी त्या वेळी मिळाल्याने सुमारे अडीच महिने शहरवासीयांना पाणीपुरवठा करणे पालिकेस शक्य झाले होते. दहा दिवसांपासून तलावाने पाण्याचा तळ गाठत आल्याने पाणीपुरवठा विभागाने तारेवरची कसरत करत पाणी पुरविले. दोन दिवसांपूर्वी या साठवण तलावातील पाणी संपुष्टात आल्याने साठवण तलावातील मृत पाणीसाठ्यातून पालिकेने पाणी शुद्धीकरण करून शहराला पाणीपुरवठा करण्यात सुरुवात केली. परंतु पाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. महिन्यापासून शहराला चार दिवसांआड एकवेळेस हा पाणीपुरवठा सुरू होता. पाणी आटत आल्याने पालखेड कालव्याला पाणी सोडण्याची मागणी मुख्यधिकरी संगीता नांदुरकर व प्रशासनाने केली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही टंचाईची माहिती मुख्याधिकारी नांदुरकर यांनी दिली होती. या मागणीमुळे पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार पालिका व येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मनमाड नगरपरिषद आणि मनमाड रेल्वे यांच्यासाठी पाणी आवर्तन सोडले आहे. पालखेड धरणातून पालखेड डाव्या कालव्यामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेले पाणी जलदगतीने गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या टप्पा क्रमांक दोन साठवण तलावात पोहचले. पाण्याचा विसर्ग बघता तीन ते चार दिवसांत पालिकेचा हा साठवण तलाव पूर्ण भरला जाणार आहे. यामुळे शहरवासियांवरील पाण्याचे सावट टळले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button