Surgana

बोरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा

बोरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा

विजय कानडे

आदिवासी समाजातील मुलांना स्वतःचे अधिकार समजावे, आदिवासींच्या अधिकाराची जाणिव व्हावी यासाठी आयोजित १३ सप्टेंबर, जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा आदिवासी क्षेत्रात आहे. ९९ टक्के विद्यार्थी हे आदिवासी कुटुंबातील आहेत. या मुलांना आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी, तसेच आपल्या समाजाला मार्गदर्शन करता यावे. आपल्या समाजाला एक पाऊल सशक्तीकरणाकडे घेऊन जाता यावे या विचाराने दिवस साजरा करीत आहोत.
साजोळे येथील उपक्रमशील शिक्षक भागवत चौधरी यांनी आपले मनोगतात सांगितले की, आदिवासी संस्कृती महान संस्कृतीपैकी एक आहे. निसर्ग देवतेचे संरक्षण व्हावे, बोलीभाषा जपणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याकरिता प्रथमतः स्वतःपासून अनुकरण सुरू केले पाहिजे.
यावेळी राणा चौधरी, कैलास चव्हाण, वामण गावित, दत्तात्रेय बागुल, लक्ष्मण भोये, भाग्यश्री पवार उपस्थित होते. कार्यक्रम कृष्णा बागुल यशस्वितेसाठी प्रयत्न केले. तर आभार गणेश गायकवाड यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button