Chandwad

जागतिक प्राणीजन्य रोग दिन भूषण कासलीवाल यांच्या उपस्थितीत चांदवडला रेबीज लस देऊन दिन साजरा

जागतिक प्राणीजन्य रोग दिन भूषण कासलीवाल यांच्या उपस्थितीत चांदवडला रेबीज लस देऊन दिन साजरा

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : प्राण्यांपासून मानवाला संक्रमित होऊ शकणार्ऱ्या रोगाचा धोका आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी बद्दल मार्गदर्शन पशुपालकांना केले रेबीज,ब्रुसेलला,ॲनथकस, टिबी , Avian Influenza, Leptospirosis, Nipa, Ebola, swine Fever, Bird flu, Ecinococosis, Q Fever, Salmonella, Glander हे प्राणीजन्य आजार आहेत यासाठी यावर उपचार करून यापासून कसे बचाव करू शकतो याबद्दल पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 चांदवड येथे शिबीर आयोजित करण्यात आले.चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री.भूषण कासलीवाल यांच्या उपस्थितीत यावेळी चांदवड येथेही जागतिक प्राणीजन्य रोग दिन साजरा करण्यात आला. त्यांत 3 मांजर व 10 कुत्रे यांना रेबीज रोग चे लसीकरण करण्यात आले. 13 जनावरे चे लसीकरण केले.यावेळी डॉ. वैभव विश्वासराव आहेर पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1,चांदवड ता. चांदवड, नाशिक श्री. गोकुळ अजृण चव्हाण व्रणोपचारक, चांदवड श्री. राजेश जावरे पशुधन पर्यवेक्षक, चांदवड पंचायत समिती श्रीमती दिपाली खाडिलकर पशुधन पर्यवेक्षक, चांदवड पंचायत समिती डॉ. पंकज कळसकर पशुधन विकास अधिकारी , दुगाव डॉ. दत्ता मोटेगावकर पशुधन विकास अधिकारी, बोपाने, शेबाज शेख,चांदवड हे सहभागी झाले श्री. समीर काळे श्री वृंदावन एजन्सी चांदवड यांच्या सौजन्याने कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button