Ausa

तपसे चिंचोली,गाडवेवाडी येथे महिला दिन साजरा

तपसे चिंचोली,गाडवेवाडी येथे महिला दिन साजरा

प्रशांत नेटके औसा

औसा : एस बी आय फाऊंडेशन मुंबई व जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ग्रामसेवा कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथे जागतिक महिला दिन ८ मार्च २०२१ रोजी साजरा करण्यात आला.

गाडवेवाडी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना असलेले हक्क व अधिकार तसेच महिलांनी स्वतः स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून लघुउद्योग केले पाहिजे. तसेच सर्वांनी बँकिंग व्यवहार केले पाहिजे , आर्थिक विकास करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे असे मत मान्यवरांनी या वेळी मांडले . या कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी श्री जोशी साहेब ,महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सह्योगिनी सरोजा बनसोडे , ग्रामपंचायत सदस्य अल्का नागनाथ गाढवे व राजश्री हिराजी राठोड, आशा कार्यकर्ता नंदिनी माधव गाढवे ,अंगणवाडी सेविका लताबाई तुकाराम कांबळे, छबिता सिधेश्वर खरोसे,रेखा दत्तात्रय भारती,मुक्ताबाई भाऊराव राठोड , ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाढवे, एस बी आय .चे ग्रामसेवक विकास भारती, बापू कदम ,राहुल घुळे, पद्माकर तौर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुळे यांनी केले व आभार अल्का गाढवे यांनी मांडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button