Mukatainagar

आमदार मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील यांनी जो निर्धार केला आहे, त्यासाठी आमची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे,.. राष्ट्रवादीचें शरद पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री

आमदार मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील यांनी जो निर्धार केला आहे, त्यासाठी आमची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे,.. सुप्रीमो राष्ट्रवादी शरद पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री,

विलास ताठे

मुक्ताईनगर, जळगाव येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून बळाराजाशी संवाद साधला.

आम्ही नागपूरहून शेतकरी दिंडी काढली असता ती दिंडी मुक्ताईनगरलाही आली होती,त्यावेळी इथले स्व.लीलाधर पाटील दिंडीत सहभागी झाले होते. त्यांना त्यावेळी अटकही झाली. आपला जिल्हा अडचणीत असेल तेव्हा संकटावर मात करण्याची जिद्द मुक्ताईनगरच्या लोकांमध्ये आहे,हे लीलाधर पाटील यांनी दाखवून दिले.

मुक्ताईनगरने आजही आपले संकटांवर मात करण्याचे धोरण सोडलेले नाही. या भागातील विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की जिल्ह्यात पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. ही कामे पूर्ण करण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी दाखवली आहे.

आज राज्याचे नेतृत्व मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने एकत्र काम करण्याची भूमिका स्वीकारली आहे. महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवणे हे एकच उद्दिष्ट्य आमच्यासमोर आहे.

कुऱ्हा-वढोदा उपसा सिंचन योजनेत रिगाव गावातून पाणी उचलून इस्लामपूर जवळ साठवले गेले. जवळपास २६-२७ हजार हेक्टर जागेला यातून पाणी मिळेल. यावर ७०० कोटी खर्च केला आहे. उर्वरित काम शिल्लक आहे.

अशीच परिस्थिती वरणगाव तळवेल पाणी सिंचन योजनेची आहे. इथे दोन टप्प्यात पाणी उचलून ओझर खेडच्या धरणात साठवले तर तिथले शेतीचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. इथे ४०० कोटींची रक्कम खर्च झाली आहे.

बोधवड सिंचन योजनेसाठी देखील काळजी घेतली तर बोधवड भागातील ३३ हजार हेक्टर व मलकापूर बुलडाणा येथे १९ हजार हेक्टर जागेला सिंचनाचा लाभ होईल. इथे ३७१ कोटी खर्च झाले असून ६० कोटींची तरतूद आहे. एकदा या भागात शे-पाचशे कोटी खर्च केले तर हा भाग पाणी आणि शेतीसाठी मागास आहे, असं कोणीही म्हणणार नाही.

तसेच इथे एमआयडीसी उभारल्या पाहिजेत, कारखानदारी वाढली पाहिजे, त्यासाठी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरूण वर्गाचा समावेश असला पाहिजे, त्यासाठी उद्योग वाढले पाहिजेत, असा माझा प्रयत्न आहे. शेती आणि उद्योग या दोन्हीमध्ये लोकांचा सहभाग वाढवून कुटुंबाचा जीवनस्तर सुधारण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.

आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्यास उपस्थित आहेत, याचा अर्थ या भागात बचतगटाची चळवळ वाढवण्याची गरज आहे, कमी व्याजदरात महिलांना उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्यामार्फत संसाराला हातभार लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, त्याबाबत निश्चितपणे पावले उचलली जातील.

एका जिद्दीने, एकजुटीने आणि अपेक्षेने या भागातील लोकांनी चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली, आणि कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता पाटील यांनी मा. मुख्यमंत्र्यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा जो निर्धार पाटील यांनी केलाय, त्याला बळ देण्याची आमची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Back to top button