Chandwad

चांदवड नगरपरिषदेच्या दोन जनमाहिती अधिकाऱ्यांना माहिती आयुक्तांचा दणका!!

चांदवड नगरपरिषदेच्या दोन जनमाहिती अधिकाऱ्यांना माहिती आयुक्तांचा दणका!!

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषदेतील दोन जनमाहिती अधिकारी यांना माहिती आयुक्त नाशिक श्री बिष्णोई साहेब यांनी 2017 या वर्षाच्या 6 अपील प्रकरणांमध्ये एकूण 65000 रुपये एवढा दंड केलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चांदवड नगरपरिषद मध्ये सन 2017 या वर्षी काही नागरिकांनी माहिती अधिकारात माहिती मागितलेली होती.सदर प्रकरणात पहिली अपील होऊनही सविस्तर माहिती न मिळाल्याने नागरिकांनी द्वितीय अपील माहिती आयुक्त नाशिक यांचेकडे दाखल केली होती यात तत्कालीन जनमाहिती अधिकारी श्री संजय रामभाऊ क्षीरसागर यांना अपील 4463/2017 दंड 15000रु, 4464/2017 दंड 15000रु, 4465/2017 दंड 10000रु, 4466/2017 दंड 10000रु, 4467/2017 दंड10000रु असा एकूण 60000रु चा दंड वसूल करण्याचे आदेश दिले असून तत्कालीन जनमाहिती अधिकारी श्री शेषराव रामदास चौधरी यांना अपील क्रमांक4738/2017 दंड 5000 रुपये वसूल करण्याचे आदेश माहिती आयुक्तांनी दिलेले आहेत.
सदर दंडात्मक प्रकरणामुळे नगरपरिषदेच्या कर्मचारी,नगरसेवक व नागरिक यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली असून माहिती अधिकारात माहिती मागितल्यास टाळाटाळ केली जाते असे अनुभव अनेकांना असल्याने आतातरी नगरपरिषद कार्यालयात जनमाहिती अधिकारी ,अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावले जातील जेणेकरून माहिती मिळणे सोपे होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button