Surgana

लोकप्रतीनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना येणार कधी जाग?सुरगाणा तालुक्यातील चंद्रपूरमध्ये भरपावसात सागाच्या पानाखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ का?

लोकप्रतीनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना येणार कधी जाग?सुरगाणा तालुक्यातील चंद्रपूरमध्ये भरपावसात सागाच्या पानाखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ का?

सुरगाणा तालुक्यातील गोदुने ग्रामपंचायत अंतर्गत येते.येणाऱ्या चंद्रपूर येते . स्मशानभूमी शेड नसल्याने सोमवारी ५/९/२०२२ रोजी भरपावसात मोतीराम गवू बागुल (३५) यांच्यावर सागवान पानाना झाकून अंत्यविधी करण्याची वेळ नातेवाइकांवर आली.अशा घटना नेहमी तालुक्यात कोणत्या कोणत्या तरी गावात स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ताडपत्री लावून अंतविधी करण्यात आला.तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून सुध्दा अशी वेळ का येती. सुरगाणा तालुका अतीदुर्गम भागत येते.त्यामुळे येतील आदिवासी बांधव कायम वंचित राहिलेला आहे.जिवंत असताना सर्व सुख सुविधा मिळत नाही.आयुष्यभर याचाना भोगत असतो.आणि मरणा नंतर असे हाल का?
चंद्रपूर येते सोमवारी मोतीराम बागुल यांचे निधन झाले.आणि पाऊस जोऱ्यात चालू होता.आणि अंतविधी कसा करावा.कारण चंद्रपूर येथे स्मशानभूमी शेड नाही. यांची चिंता नातेवाइकांना होती.शेवटी नातेवाईकांनी सागवान पाने जमविली आणि अंत्यविधी करून घेतला.या वेळी जमलेल्या लोकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर रोष व्यक्त केला. तालुक्यांत ६२ ग्रामपंचायत आणून३७२ गाव पा संख्या आहे.त्या पैकी १०० ठिकाणी स्मशानभुमी आहे.बाकी ठीकणी स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ही अवस्था आहे.आता तरी ही अवस्था बघून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का?कोणी जर आवाज उठवला तो बंद केला जातो.तरी आता तरी माझा बांधवाना स्वांतत्र मिळाले नाही.
दोन वर्षात तिसरी घटना आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button