Rawer

श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द च्या वतीने सार्वजनिक दहीहंडी साजरी झाली.

श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द च्या वतीने सार्वजनिक दहीहंडी साजरी झाली.

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द च्या वतीने काल दि.७ सप्टेंबर गुरुवार रोजी आयोजित केलेली दहीहंडी श्रीकृष्ण दही हंडी पथक या गोविंदा पथकाने फोडली.

यानिमित्ताने श्रीकृष्ण मंदिराचे मठाधीपती आचार्य नरेंद्र महाराज यांच्या वतीने रोख 2100 रुपयांसह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी दहीहंडी उत्सव सन २०२३ वर्षाची दहीहंडी श्रीकृष्ण दहीहंडी पथक खिर्डी खुर्द या गोविंद पथकाने पहिल्याच फेरीत तीन थर लावत मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.सदरहू अंकित सुनील मनसुटे या गोविंदाने ही दहीहंडी फोडली.प्रसंगी श्रीकृष्ण दहीहंडी पथकाच्या वतीने एकच जल्लोष करत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.पहिल्याच फेरीत श्रीकृष्ण दहीहंडी गोविंदा पथकाने तीन थर लावत हि दहीहंडी फोडण्याची किमया साधल्यामुळे या गोविंद पथकास योग्य बक्षीस देऊन सत्कार केला .

श्रीकृष्ण दहीहंडी खिर्डी या पथकाने दहीहंडी फोडली…

सागर मनसुटे,तेजस महाजन अंकित मनसुटे, चिराग खाचणे, हेमन्त भिरूड,अजय इंगळे,हेमंत भारंबे,खगेश महाजन गौरव कोळंबे,कन्हया तडवी,विशाल तडवी,हितेंद्र भंगाळे, दीपक भिरूड,लाभेश ,शुभम शिरनामे,लावण्य खाचणे,वैभव कोचुरे,दीपक घोरपडे,अक्षय शिरनामे,यश कोळी,विवेक ,चेतन बोरनारे,ईशांत भंगाळे,परशा कोचुरे,विजय तडवी, हेमन्त भंगाळे, या पथकाने फोडली.
यावेळी गिरीश महाजन,प्रमोद महाजन,सुभाष भिरूड,तिलोक तडवी,विलास मिस्त्री,मुरलीधर महाजन,सुपडू कोचुरे,संजय शिरनामे, खिर्डी खुर्दचे पोलीस पाटील प्रदीप पाटील,खिर्डी बुद्रुक चे पोलीस पाटील रितेस चौधरी यांच्यासह ग्रामस्त व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.
यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे स हायक पो.निरीक्षक गणेश धुमाळ यांच्यास ह पोलीस कर्मचारी व राजरत्न ढोल पंथक खिर्डी खु यांच्या वाद्या ची सहकार्य घेऊन कार्यक्रम पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button