sawada

?️ सावदा रेल्वे स्टेशन येथे गुंडाराज. ? अज्ञात भामट्यांनी बाईक, चारचाकी वाहनांची तोडफोड करून केली जाळपोळ : वाचमनला मारहाण करून केले जखमी

?️ सावदा रेल्वे स्टेशन येथे गुंडाराज. ? अज्ञात भामट्यांनी बाईक, चारचाकी वाहनांची तोडफोड करून केली जाळपोळ : वाचमनला मारहाण करून केले जखमी

पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल

सावदा :- शेख फरिद

सावदा स्टेशन येथे काल दि. २४-७-२०२० रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास अज्ञात चोरांनी लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांच्या कूल स्टोरेज येथे उभ्या असलेल्या शिंदे यांच्या फोर-व्हिलर व टू-व्हीलर ची तोड फोड करून जाळण्यात आल्यावर तेथे वॉचमन म्हणून असलेल्या इसमाला मारहाण करण्यात आली. त्या नंतर त्या वॉचमन ने गावाकडे धाव घेतली व शिंदे यांना फोन करून झालेल्या घटनेचे माहिती दिली.

लागलिच शिंदे कुटुंब घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला ते आटोक्यात येत नसता, त्यांनी सावदा नगर पालिका येथे अग्निशामक दलास फोन करून आग लागल्याचे सांगितले व घटना स्थळी दाखल होण्यास सागितले. अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाल्या नंतर आग विझविण्यासाठी यश मिळाले. तसेच या सर्व घटनेचे माहिती सावदा पोलिस स्टेशन ला देण्यात आली असून पुढील तपास सावदा पोलिस स्टेशन करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button