Satara

26 जानेवारी निमित्त “आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचा वेबिनार

26 जानेवारी निमित्त “आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचा वेबिनार

सातारा – आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समाज बांधवांसाठी ऑनलाईन वेबिनार ” स्वातंत्र्याचा लोकशाहीचा व शिक्षणाचा प्रकाश आदिवासी समाजातील पालाप्रर्यत अद्यापही पोहोचला नाही “_ या चर्चासत्राचे आयोजन केलेले होते.वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.डॉ. निसर्गगंध प्रभाकर यांना आमंत्रित केलेले होते.

प्रा.डॉ. निसर्गगंध प्रभाकर यांनी _स्वातंत्र्याचा लोकशाहीचा व शिक्षणाचा प्रकाश आदिवासी समाजातील पालाप्रर्यत अद्यापही पोहोचला नाही “_ भारतीय संविधान व बहुजन समाज्यातील हाल अपेष्टा विषयी संबोधित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले.बहुजन,आदिवासी व भटक्या जाती व जमातीना योग्य न्याय मिळेल त्यासाठी विविध योजना आणि आयोग नेमले त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाच दशकाचा कालावधी गेला तरी अजून तळागाळातील समाज्याला न्याय भेटला नाही.माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र,निवारा यापेक्षा आपले मूलभूत अधिकार आपणास मिळायला हवेत.सत्ता व संपत्तीमध्ये वाटा मिळायला हवा नाहीतर पुढील पिढीला आपण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असणार नाही.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व न्यायिक क्षेत्रात एका विशिष्ट समुदायाचे वर्चस्व आहे.त्याठिकाणी आपल्या हक्काचे व न्याय देण्यासाठी आपले पाठबळ तिथंपर्यंत पोहचू न देणे हे शोकांतिका आहे.ऑनलाईन वेबिनार यशस्वी करण्यासाठी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button