Satara

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी ..गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास होणार कारवाई

दिलीप वाघमारे

सातारा, दि.15 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू झाल्याचे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका आदेशान्वये घोषित केले आहे.
या आदेशानुसार पूर्वतयारीसाठी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणून डॉ. अमोद गडकरी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा (मो.क्र.9422471912, ईमेल- [email protected]) व डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा (मो.क्र.9421233250, ईमेल[email protected]) यांना सनियंत्रक म्हणून घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रिडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यत परवानगी देण्यात येऊ नये. यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास ती रद्द करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसार्गात अधिक वाढ होवू यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठया प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा इत्यादीवर दि. 15 मार्च 2020 ते पुढील आदेश होईपर्यंत बंदी लागू करण्यात येत आहे. यापूर्वी परवानगी देण्यात आलेली असल्यास सदर परवानग्या रद्द करण्यात येत आहेत.

यात्रा, ऊरुस, धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पूजारी किंवा धर्मगुरु इत्यादींना विधिवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम कमीत कमी मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास व खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतू या दोन्हीबाबतीत सर्व वैद्यकीय आरोग्यविषयक सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. सर्व शासकीय यंत्रणांनीही अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यांदींच्या आयोजनासंदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर देण्यात येऊ नये.

सातारा जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना तथा दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात होणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी व फक्त विधिवत पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार तात्पुरत्या स्वरुपात प्रदान करण्यात येत आहेत. तथापि सदरची परवानगी देताना पोलिस व आरोग्य विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे अवश्यक आहे.
या आदेशाचे उल्‌लंघन करुन गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित व्यक्ती/संयोजकांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल यासाठी सर्व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button