Nashik

वारकरी भाविकांनी एकत्र यावे- माधव महाराज शास्री घोटेकर खेडलेझुंगेकर याचे आवाहन…

वारकरी भाविकांनी एकत्र यावे- माधव महाराज शास्री घोटेकर खेडलेझुंगेकर याचे आवाहन…

प्रतिनिधी : शांताराम दुनबळे यांजकडून

नाशिक : वारकरी भाविकांची संख्या जिल्हाभरात अगण्य आहेत,सर्व जर वारकरी महामंडळात एकत्र सहभागी झाले तर जिल्ह्यात एक संघशक्ती उभी राहुन वारकरी प्रश्न लवकर सुटतील, वारकरी संघटन होण्यासाठी महाराष्ट्र वारकरी महामंडळ हा एकमेव पर्याय आहे जिल्हाभर माझे हयातीत अनेक संघटना आल्याही आणि त्याच वेगात त्या नामशेषही झाल्या. प्रदेशाध्यक्ष हभपश्री कृष्णाजी महाराज रांजणे,प्रदेश कार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व संघटन कुशल जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांचे खंबीर नेतृत्वाखाली जिल्हाभर योग्य दिशेने वाटचाल चालु आहे. परंतु वारकरी महामंडळ ही एक त्यागातुन वै.हभप रामदास बाबा मनसुख यांनी स्थापन केलेली सर्व संत वारकरी मान्य संघटना आहे. ही वैयक्तीत लाभासाठी निर्माण केलेली नाही,या संघटनेत जे आले ते समाजमान्य व लोकमान्य संतमान्य ठरले. संघटनेचे कार्य ज्यांच्याकडुन घडले ते खुप मोठेच झाले हा आजवरचा इतिहास आहे. वारकरी भाविकांचे प्रश्न महामंडळच सोडवु शकेल असा सुज्ञ वारकरी गुणीजनांचा निश्चित विश्वास आहे.याकरीता इकडे तिकडे भ्रमंती करण्यापेक्षा वारकरी महामंडळातच राहुन काम केल्यास जिल्हाभर वारकरी भाविकांची एक संघशक्ती तयार होईल असे प्रतिपादन वारकरी महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री माधव महाराज शास्री घोटेकर यांनी प्रमुख अतिथी म्हणुन शिवडा ता.सिन्नर येथे फलक अनावरण करतांना केले, नुकतेच हभपश्री.माधव महाराज शास्री घोटेकर यांचे शुभहस्ते वारकरी महामंडळ फलकाचे उद् घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. संत श्री.निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था शिवडे व तालुकाउपाध्यक्ष हभपश्री भरत महाराज वाघ यांचे कार्याबद्दल ही गुण गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळ युवा समिती जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे होते,हभपश्री संदिप महाराज खकाळे म्हणाले “आपण पदवी लावुन घेण्यापेक्षा पदवी सर्व जेष्ठ श्रेष्ठ मान्य असावी यात खरी आपली ओळख तयार होते. हे सर्व संत मान्य मंडळ आहे. नुतन कार्यकारीणीस जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथींचे शुभहस्ते सर्व आलेल्या वारकरी भाविकांचा गौरव करण्यात आला.व्यासपीठावर इगतपुरी तालुकाध्यक्ष विष्णु महाराज झणकर,जिल्हासंपर्क प्रमुख साहेबराव महाराज अनवट हातणोरे,,युवासमिती जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाराज पाटील निळवंडी,मुख्याध्यापक मधुकर वाघ,पोलीस डिपार्टमेंचे तुकाराम चव्हाणके आदी उपश्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाध्यक्ष हभपश्री बबनराव हारक,जि.सदस्य हभपश्री मधुकर खेलुकर,तालुकासदस्य हभपश्री राजाराम महाराज वाघ, वारकरी महामंडळ विंचुरदळवीचे जि.सदस्य हभपश्री दिनकरराव झाडे,तालुका सदस्य हभपश्री शंकरराव निफाडे हे ही आवर्जुन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button