रावेर

अलखिदमत फाउंडेशन रावेर तर्फे  ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने रुग्णांची भेट

अलखिदमत फाउंडेशन रावेर तर्फे ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने रुग्णांची भेट

विलास ताठे
रावेर ( प्रतिनिधी ) प्रेषित मोहम्मद (सं) यांचा वाढदिवस साजरा करताना रावेर येथील अल खिदमत फाउंडेशन चे कार्यकर्त्यांनी रावेर शहरातील सर्व रूग्णालयात भेट दिली .याप्रसंगी रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून रुग्णांची वैध्किय मदत करणे, औषध,रक्त किंवा आर्थिक मदत करण्याचा हेतूने रुग्णांशी सम्प्रेशन साधला या सोबत रुग्णांना फळे ,कॉफी, बिस्कीट वगैरे देऊन त्यांची सेवा केली. तसेच संबंधित रुग्णालयाचे डॉक्टरांना मोहम्मद पैगंबर विषयी मराठी भाषेत पुस्तकेही देण्यात आली. हा आगळावेगळा कार्यक्रमातून समाजसेवा जातीय , सलोखा निर्माण करण्यासाठी व आपसातील इस्लाम विषयी गैरसमज दूर करण्याच्या हेतूने हा उपयुक्त उपक्रम रचला होता. आणि हे काळाची गरज पण आहे. सदर कार्यक्रमात अल खिदमत फाऊंडेशनचे कार्यकर्ता रेहान सर, फारुक शेख, हारून शेख , वसीम भाई शेख उमर आणि मुस्ताक सर यासोबत इत्यादींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button