Nashik

विनायक महाराज हेंबाडे यांचा किसान सभेच्या वतीने सत्कार

विनायक महाराज हेंबाडे यांचा किसान सभेच्या वतीने सत्कार

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-:लोहशिगवे येथील ह.भ.प.श्री विनायक महाराज हेंबाडे लोहशिंगवेकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नांदगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाली. ह.भ.प विनायक महाराज हेंबाडे यांचा सत्कार किसान सभा नांदगाव तालुक्याच्या वतीने किसान सभा नाशिक जिल्ह्य संघटक विजय दराडे यांनी केला. ह.भ.प.श्री विनायक महाराज हेंबाडे यांच्या हातुन वारकरी, शेतकरी यांच्या प्रश्नाचा अभ्यास करुन नक्की सोडवणुक करतील, ह.भ.प.श्री अवचितानंद महाराज जिल्हा सदस्य यांचा सत्कार किसान सभा नांदगाव तालुका आध्यक्ष शांताराम पवार यांनी केला.

यावेळी लोहशिंगवे गावचे भजनी मंडळ यांनी ही हभप विनायक महाराज हेंबाडे , हभप अवचितानंद महाराज व हभप गुलाब महाराज यांचा सत्कार करण्यात आला.या वेळेस लोहशिंगवे गावचे सरपंच पोपट हेंबाडे,मा.उपसरपंच, शिवसेना युवा नेते वाल्मिकभाऊ हेंबाडे, ह.भ.प. गुलाब महाराज, रोहिदास हेंबाडे,श्रावण पवार शिवाजी गोसावी, मधुकर मांजरे, खंडु पवार यांसह मान्यवर उपस्थित होते.तालुक्यातील सर्व वारकरी,गुणीजन, किर्तनकार, राष्ट्रीयअध्यक्ष हभपश्रीप्रकाश महाराज बोधले डिकसळ,जिल्हाध्यक्ष हभपश्री.आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर, जिल्हासदश्य हभपश्री नंदु महाराज भालुरकर यांनी ही नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button