Rawer

खिर्डी खुर्द येथिल श्रीमती एस पी राणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय 15 ते 18 वयोगटातील 164 विद्यार्थ्यांचे लसीकरण

खिर्डी खुर्द येथिल श्रीमती एस पी राणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय 15 ते 18 वयोगटातील 164 विद्यार्थ्यांचे लसीकरण

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी श्रीमती एस पी राणे माध्यमिक विद्यालय व खिर्डी कनिष्ठ महाविद्यालय खिर्डी खुर्द तालुका रावेर येथे 15 ते 18 वयोगटातील 9वी ते 12वीच्या 164 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी निंभोरा आरोग्य केंद्र येथील डॉ.श्री. प्रतीक पाटील, डॉ.श्री. चंदन पाटील ,डॉ. श्रीमती एस. बी. पाटील उपस्थित होते,तसेच खिर्डी येथील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या .
यावेळी सर्व डॉक्टर ,आरोग्य सेवक, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा संस्थेचे चेअरमन श्री .भास्कर गणपत भंगाळे ,मुख्याध्यापक श्री.अशोक सिताराम भंगाळे, शिक्षक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाय. बी. नेरकर सर यांनी केले. लसीकरण मोहीम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मा.मुख्याध्यापक श्री. अशोक सिताराम भंगाळे ,विलास पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button